शरीरसुखाच्या मागणीला विरोध; महिलेसह कुटुंबियांना मारहाण Saam Tv
महाराष्ट्र

शरीरसुखाच्या मागणीला विरोध; महिलेसह कुटुंबियांना मारहाण

...त्यांनतर वाद सुरू झाला. यावेळी शरीरसुखाला नकार देताच, त्याने पीडितेचा हात ओढत मारहाण केली.

विनोद जिरे

बीड: शरीरसुखाच्या मागणीला विरोध केल्याने, महिलेसह कुटुंबातील व्यक्तींना जबर मारहाण करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या दिंद्रुडमध्ये घडली आहे. पीडित महिला आपल्या शेतात काम करत असताना, शेजारील एका व्यक्तीनं, महिला एकटी काम करत आहे. हे पाहून छेडछाड करत 'तुझा नवरा बाहेरगावी असतो, असं म्हणत शरीर सुखाची मागणी केली.

त्यांनतर वाद सुरू झाला. यावेळी शरीरसुखाला नकार देताच, त्याने पीडितेचा हात ओढत मारहाण केली. यावेळी मध्यस्थीला धावून आलेल्या घरातील वृद्ध दांपत्याना देखील आरोपी सह पाच जणांनी, पीडित कुटुंबातील सर्वांना मारहाण केली. यावेळी काट्या कुऱ्हाडीसह लाथा बुक्याने ही मारहाण करण्यात आल्याचं पीडित कुटुंबानी सांगितलं आहे.

संबंधित घटनेनंतर दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधात दोन पोलीस पथक रवाना झाली आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी दिली आहे. दरम्यान मारहाणीमध्ये जखमी झालेल्या पीडित जखमी कुटुंबातील काही जणांवर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT