Leader of Opposition in the Assembly Saam Tv News
महाराष्ट्र

Assembly Opposition Leader : विरोधी पक्षनेतेपदाचा 'भास्कर' कधी उगवणार? अध्यक्षांच्या निर्णयाकडे विरोधकांचं लक्ष

Assembly Opposition Leader : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले तर दुसरीकडे विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतके ही संख्याबळ गाठता आली नाही.

Tanmay Tillu

तन्मय टिल्लू, साम टीव्ही

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले तर दुसरीकडे विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतके ही संख्याबळ गाठता आले नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेतेपदाचा विचार केला जाणार का ? त्यावरचा हा रिपोर्ट.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले तर दुसरीकडे विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतके ही संख्याबळ गाठता आली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेतेपदाचा विचार केला जाईल अशी शक्यता होती. मात्र शेवटचे पाच दिवस शिल्लक असताना तरी विरोधी पक्षनेतेपदाचा 'भास्कर' उगवणार? का याची उत्सुकता शिगेला पोहचलीये. दरम्यान विरोधी पक्षनेते पदासाठी मविआकडून काय काय हालचाली करण्यात आल्या पाहूया.

विरोधी पक्षनेतेपदाचा 'भास्कर' कधी उगवणार?

हिवाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेतेपदाविनाच

मविआतील ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांचं नाव

नावावर अद्याप कुठलाही निर्णय विधानसभा अध्यक्षांकडून नाही

विरोधी पक्षनेता निवडीसाठी कोणतीही खास तरतूद नाही

मविआकडून विरोधी पक्षनेते पदासाठीची प्रक्रिया पूर्ण

विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घेण्याची मागणी

गेल्या पंधरा दिवसांमध्ये दोन वेळा भास्कर जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील काही प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची दोन वेळेस भेट घेतली. त्यावेळी विरोधी पक्षनेते पदासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती करण्यात आलीये. त्यानंतर आजपर्यंत तरी कुठलाच निर्णय झालेला नाही. त्यामुळे हे अधिवेशन संपेपर्यंत निर्णय होणार का ? याची उत्सुकता लागली आहे. निर्णय झाला नाही तर सलग हिवाळी अधिवेशनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेते पदाविना जाणार एवढं नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT