THACKERAY SENA TURNS AGGRESSIVE AGAINST REBEL MPS; MASSIVE SLOGANEERING AT NANDED AIRPORT Saam tv
महाराष्ट्र

बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेसेना आक्रमक, नांदेड विमानतळावर जोरदार घोषणाबाजी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहा खासदार सामील झाल्यानंतर 'ऑपरेशन तोडवा'सुरू झाली. नांदेड विमानतळावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोर नेत्यांविरोधात घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करत आहेत.

Bharat Jadhav

खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन टायगरला प्रत्युत्तर म्हणून आपण ऑपरेशन तुडवा राबवणार असल्याचं म्हटलं होतं. आता त्याची झलक राज्यातील ठिकाठिकाणी पाहायला मिळत आहे. आज सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक झालेत. नांदेड विमानतळावर कार्यकर्त्यांकडून बंडखोर खासदारांविरुद्धात घोषणाबाजी केली जात आहे.

याआधी भिवंडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षातून फुटलेल्या सहा खासदारांच्या निषेधार्थ ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. आज मु्ंबईत बंडखोर खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव आणि संजय देशमुख हे तिन्ही खासदार नांदेड विमानतळावर उतरणार आहेत. त्याआधी ठाकरे गटाच्या कार्यकर्ते तेथे जमले असून त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. 'गद्दार गद्दार' असे पोस्टर हातात घेऊन ठाकरे सेनेचे कार्यकर्ते घोषणा देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सांगली-साताऱ्यात महायुतीची मतं फुटली?मविआला महायुतीच्या 99 मतदारांचा पाठिंबा

Maharashtra News Live Update: बीडमध्ये उद्यापासून शाळेची वेळ: सकाळी ८:०० ते दुपारी १२:३०

मुलाच्या खांद्यावरुन नेम, ठाकरेसेनेचा गेम, ठाकरेसेनेच्या कृष्णा आष्टीकरांचा पराभव

'संविधान बदलण्यासाठी फोडाफोडी' खासदारांच्या फुटीमागे छुपी रणनीती? ठाकरेंचा गंभीर आरोप

धक्कादायक! मुंबई लोकलच्या दरवाज्यात तरुणांची मद्यपार्टी; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT