Pune Dam Water Level Today Saam TV
महाराष्ट्र

Water Storage in State : राज्यातील धरणांमध्ये केवळ ६४.७० टक्के पाणीसाठा, तुमच्या जिल्ह्यात किती पाणीसाठा उपलब्ध? पाहा लिस्ट

Dam water level : गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजे १९.१९ टक्क्यांची तूट धरणांच्या पाणीसाठ्यात निर्माण झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News :

राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावत आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीब हंगाम वाया गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. दुसरीकडे पाऊस पडला नाहीतर पाणी टंचाईचा सामना महाराष्ट्राला येत्या काळात करावा लागू शकतो. कारण राज्यातील धरणांमध्ये केवळ ६४.७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजे १९.१९ टक्क्यांची तूट धरणांच्या पाणीसाठ्यात निर्माण झाली आहे. पुणे विभागात सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या तीन विभागातील १३ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये ५९ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठी उपलब्ध आहे.

६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असलेले जिल्हे

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे.  (Latest Marathi News)

६० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेले जिल्हे

बुलढाणा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर या जिल्ह्यांमधील धरणांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी

पाणीटंचाईची फार मोठी समस्या उभी राहू शकते. आता कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी होऊ लागली आहे. कृत्रिम पावसासाठी पोषक वातावरण असल्यास पाऊस पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शास्त्रज्ञांशी चर्चा देखील सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून याबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Papad Rassa Bhaji :गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT