Online Order Froud Saam tv
महाराष्ट्र

Online Order Froud : ऑनलाइन कॅमेरा मागवला मिळाला साबण; पोलिसात गुन्हा दाखल

ORDER FROUD ऑनलाइन कॅमेरा मागवला मिळाला साबण; पोलिसात गुन्हा दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Khalapur : : ॲमेझॉन ॲपवरून ६० हजार रुपये किमतीचा कॅमेरा मागवला असता त्याजागी साबण, बॅटरी, चार्जर व इतर वस्तू आल्याचा धक्कादायक (Online Fraud) प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे त्या वस्तू बदलवून (Fraud) देण्यास देखील कंपनीने नकार केला आहे. (Latest Marathi News)

प्रशांत लेंडवे या तरुणाने ॲमेझॉन ॲपवरून कॅनोन एम फिफ्टी मार्क टू या कंपनीचा कॅमेरा ऑनलाईन हप्त्यावर खरेदीसाठी ऑर्डर दिली. सायंकाळी आल्यावर आलेले पार्सल खोलून पाहिले असता त्यात सर्फ एक्सेल कंपनीचा साबण, कॅनन कंपनीचा बॅटरी चार्जर, चार्जर केबल, कॅनोन कंपनीची कॅमेरा कॅरिअर रस्सी आणि स्टील फ्लेक्सिबल पाईप अश्या वस्तू मिळून आल्या. 

पोलिसात तक्रार 

याप्रकरणी ॲमेझॉनच्या ग्राहक केंद्राला तक्रार केली असता ऑर्डर परत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे  तरुणाने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा... अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा PM मोदींचं नागरिकांना आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT