Agitated onion farmers block the Nandgaon-Yeola road demanding ₹1500 subsidy and fair market price after sharp fall in onion rates. saam tv
महाराष्ट्र

Onion Farmer Protest: 'कांद्याला 1500 रुपये अनुदान द्या'; कांद्याचे दर घसरले, शेतकरी रस्त्यावर

Onion Farmer Protest: कांद्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. कारण कांद्याचे दर पडलेत आणि शेतकरी संकटात सापडलाय. मात्र कांद्याचे दर पडण्यामागे कोणती कारणं आहे. आणि सरकारविरोधात शेतकरी कसे आक्रमक झालेत. पाहूयात. या स्पेशल रिपोर्टमधून.

Girish Nikam

  • कांद्याचे बाजारभाव ७०० ते १०५० रुपयांवर घसरले.

  • शेतकऱ्यांनी १५०० रुपये अनुदान आणि हमीभावाची मागणी केली.

  • नांदगाव-येवला मार्गावर रस्ता रोको आंदोलन.

दरवर्षीप्रमाणे यंदा पुन्हा कांद्यानं शेतकऱ्यांचा वांधा केलाय. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे झालेले नुकसान, दुबार पेरणी आणि खतांचा खर्च यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला आता बाजारभावाचाही फटका बसलाय. कांद्याला ७०० ते १०५० रुपये भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झालेत. इतक्या पैशांमध्ये उत्पादन खर्च देखील वसूल होणे कठीण असल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा बांध फुटला. संतप्त शेतकऱ्यांनी नांदगाव-येवला मार्ग रोखून धरला. कांद्याला हमीभाव मिळावा, अशी मागणी कांदा उत्पादकांनी केलीय.

दुसरीकडे चांदवडमध्ये शेतकरी आमरण उपोषणाला बसलेत. विधीमंडळाचं अधिवेशन सुरु असताना कांदा उत्पादकांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधलंय. गेल्या 2 महिन्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. एक हजार रुपयांपर्यंत भाव गडगडलेत. चांदवड तालुक्यामध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे चांदवड बाजार समितीत कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरवात केलीये.

कांद्याला 3000 हजार रुपये हमीभाव, आजपर्यंत विक्री झालेल्या कांद्यास प्रतिक्विंटल 1500 रुपये प्रमाणे अनुदान मिळावे. तसेच मका हमीभाव खरेदी केंद्र वाढवून हमीभाव खरेदीला गती द्यावी, अशी मागणी आहे. त्याशिवाय 2 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या मक्याचे पेमेंट तात्काळ जमा करावे, अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी आमरण उपोषणाला बसलेत. अतिवृष्टी तसेच अवकाळी पाऊस, खते आणि औषधांचा वाढता खर्च, बाजारभावातील चढ-उतार यामुळे कांद्याची शेती आतबट्ट्याची झालीय. दरवर्षीचं नुकसान आणि वाढतं कर्ज यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. केंद्राच्या धरसोड निर्यात धोरणाचाही फटका बसतोय. त्यामुळे कांद्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार ? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठं खिंडार; विदर्भातील बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Maharashtra News Live Update: मोटेगावकरला अटक झाल्यानंतर पुण्यातील RCC क्लास बंद

Pravin Tarde-Deool Band 2 : "देशात सगळं ओरिजनल, डुप्लिकेट फक्त शेतकरी..."; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद' पाहून साक्षात दिसतील स्वामी|VIDEO

Ladki Bahin Yojana : पात्र असतानाही ₹१५०० बंद; घरात कार नाही, तरीही नावावर नोंद कशी? लाडक्या बहि‍णींचा संताप

Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी महागड्या क्रिम नाही; हे ७ हेल्दी टेस्टी ड्रिंक्स देतील नॅचरल ग्लो

SCROLL FOR NEXT