Onion Price Today, Nashik, Maharashtra Farmers SAAM TV
महाराष्ट्र

Onion Price In Maharashtra: नाफेडचा कांदा नकोच!; केंद्र सरकारच्या निर्णयाला शेतकऱ्यांचा का होतोय विरोध?

Onion Price Today : टॉमेटोनंतर कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रानं नाफेडचा ३ लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

Onion Price Today : टॉमेटोनंतर कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रानं नाफेडचा ३ लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. 'नाफेड'चा कांदा बाजारात आणू नये, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

कांद्याचा भाव २५०० रुपयांवर गेल्यानं दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारनं पाऊल उचललं आहे. नाफेडचा ३ लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (Latest Marathi News)

नाफेडने नाशिक, नगर आणि कोल्हापूरमधून पूर्वी खरेदी केलेला ३ लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कांद्याचे नवे पीक बाजारात येईपर्यंत बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न आहे, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. नाफेडचा कांदा बाजारात आल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना जरी परवडणाऱ्या दरात कांदा मिळणार असला तरी शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

का होतोय विरोध?

नाफेडचा कांदा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी, त्याला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी नाफेडचा कांदा बाजारात आणू नये अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.

शेतकऱ्यांना आता कुठे चांगला भाव मिळत असताना नाफेडचा कांदा बाजारात आणून शेतकऱ्यांचे नुकसान करू नका; अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा! 12 तासांचा प्रवास आता होणार 2 तासांत? या ठिकाणी धावणार नवीन बुलेट ट्रेन

Maharashtra News Live Update: विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

SCROLL FOR NEXT