Building collapsed in Bhiwandi Saam tv
महाराष्ट्र

Building collapsed in Bhiwandi: भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून २ व्यक्तींचा मृत्यू; ढिगाऱ्याखालून ११ जणांना बाहेर काढण्यात यश

Building collapsed in Bhiwandi: भिवंडी तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. वळ ग्रामपंचायत हद्दीत वळपाडा येथे इमारत कोसळली.

Vishal Gangurde

फैय्याज शेख

Building collapsed in Bhiwandi: भिवंडी तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. वळ ग्रामपंचायत हद्दीत वळपाडा येथे इमारत कोसळली. संपूर्ण इमारत भुईसपाट झाली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २२ रहिवासी दबले होते. तर या दुर्घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळपाडा येथे आज, दुपारी ही इमारत कोसळली. भिवंडीतील वर्धमान इमारत नावाची कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती.

मात्र, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २२ दबल्याची माहिती समोर आली असून ११ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. कोसळलेली इमारत ही तीन मजली होती. इमारत कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भिवंडी येथे पडलेल्या वर्धमान इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ११ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. भिवंडीची दुर्घटना घडल्यानंतर या इमारतीच्या ठिकाणी एनडीआरएफ टीम देखील दाखल झाली आहे. तर TDRF जवानांकडून आतापर्यंत आर्धा तासांत ५ लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे .

नेमकं काय घडलं?

शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भिवंडीत वर्धमान भवन नावाची इमारत अचानक कोसळली. या इमारतीच्या खाली एक गोडाऊन देखील होतं. या गोडाऊनमध्ये ३० ते ३५ नागरिक काम करत होते.

इमारतीत एकूण २२ जण अडकले होते. या पैकी ११ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून अद्याप ११ जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाण्यात पाणीटंचाईचे संकट गडद; ऑक्टोबरमध्येच ७५ पैकी ५४ पाझर तलाव आटले

5-6 Gram Mangalsutra Designs: सणासुदीसाठी 5-6 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, हे लेटेस्ट 6 पॅटर्न्स तुम्हाला आवडतील

Maharashtra : चारा बियाण्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय, ही अट रद्द; जाणून घ्या कुणाला होणार फायदा?

Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी सरकारकडून बोनस जाहीर, इतके पैसे मिळणार?

खासदारावर वाहनावर दगडफेक, लोखंडी रॉडने कार फोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT