Satara : पावसामुळे मंदिराचे छत कोसळून एक ठार तर तीन जण गंभीर जखमी ओंकार कदम
महाराष्ट्र

Satara : पावसामुळे मंदिराचे छत कोसळून एक ठार तर तीन जण गंभीर जखमी

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विरकरवाडी या ठिकाणी मायाक्का मंदिराचे नवीन बांधकाम सुरू होते. अचानक आलेल्या पावसामुळे या मंदिराचे छत कोसळून त्या खाली ४ मजूर गाडले गेले आहेत.

हे देखील पहा-

या घटनेचा आवाज मोठा झाल्याने गावकरी जमा झाले आणि जवळच जेसीबीच्या साह्याने काम सुरू होते. जुने असलेले हे मायाक्काचे देवीच्या मंदिराचे छत शहाबाद फरशीचे लोखंडी गरडेल होते व छतावर शाडूची माती होती. मंदिराचे छत अचानक खाली कोसळले. त्यांच्या मदतीने वरील मलमा, फारशा बाजूला करून ४ जणांना बाहेर काढले आहे. म्हसवड येथील खाजगी रुग्णालयात मजुरांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यावेळी उपचार सुरू असताना व्यकट पिराजी दुनवड (वय ७०) यांचा मृत्यू झाला तर पिराजी खंडाचा कोळी (वय २२) रा. भंडारकोवढे जिल्हा सोलापूर, महेश भोई (वय २३) रा. सोलापूर, उद्धव गंगाराम गुंडवड (वय-५०) रा. तांदुळवाडी जिल्हा परभणी हे तिघे गंभीर जखमी झाले. या वेळी एका मजुराचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT