फटाके वाजवण्याच्या वादातून सोलापुरात एकाचा खून Saam TV
महाराष्ट्र

फटाके वाजवण्याच्या वादातून सोलापुरात एकाचा खून

आरोपी फरार असून अज्ञात आरोपीविरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.

विश्वभुषण लिमये

सोलापूर - फटाके उडवण्याच्या कारणावरून सोलापुरातील (Solapur Murder Case) विजापूर नाका, बेघर वसाहत येथे एक जणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. नुरानी मस्जिद जवळ प्लॉट नंबर 50, बेघर वसाहत विजापूर नाका येथील रहिवासी महबूब नबीलाल करणकोट यांचा अज्ञातांकडून खून करण्यात आला आहे.

काल रात्री ही घटना घडली असून महबूब करणकोट यांनी पाळलेला घोडा फटाक्याने घाबरत असल्याने त्यांनी परिसरातील काही लोकांना फटाके उडवण्यास मज्जाव केला होता. त्यातून संबंधित आरोपींनी महबूब करणकोट यांच्या घरासमोर फटाके उडवले, यातून झालेल्या वादावादीतून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आरोपी फरार असून अज्ञात आरोपीविरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World : धगधगता ज्वालामुखी ते विषारी सापांचा सुळसुळाट, जगातील ७ धोकादायक ठिकाणे

पाकिस्तानची जागेवर पलटी! स्वतःच पोसलेल्या दहशतवाद्यावर ७० लाखांचा 'इनाम'

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

SCROLL FOR NEXT