accident news 
महाराष्ट्र

रुग्णवाहिकेस ट्रकची धडक; रुग्णाचा मृत्यू, दाेन जखमी

अनिल पाटील

पणजी : गोव्यातल्या बांबोळीतील महामार्गावर झालेल्या अपघातात एक ठार तर दाेन जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) सकाळी झाला असून ट्रकने रुग्णवाहिकेस धडक दिल्याने रुग्णवाहिकेतील नागरिकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. one-died-two-injured-in-road-accident-on-bamboli-highway-goa-marathi-news-sml80

या महामार्गावरुन रुग्णवाहिका रुग्णालयाकडे जाताना समोरून ट्रक आला आणि रुग्णवाहिकेस वाट देण्याऐवजी धडक दिली. या रुग्णवाहिकेमधील प्रकाश नाईक (वय ५३) यांचा अपघातात मृत्यू झाला. श्री. नाईक यांना ह्रदयविकाराचा झटका आला हाेता. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून गोमेकॉ रुग्णालयात नेण्यात येत होते.

या अपघातात विकास तळेकर आणि रवी नाईक हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघातात रुग्णवाहिकेच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान ट्रक चालकास पाेलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT