Crime saam tv
महाराष्ट्र

Sangli: राज्य उत्पादन शुल्कच्या जवानास हातावर तुरी देत आरोपीने ठाेकली धूम

इस्लामपूर येथील वन कार्यालयातील घटना.

विजय पाटील

सांगली : गोवा बनावट विदेशी दारु (goa liqour) तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तस्करांनी राज्य उत्पादन शुल्कच्या जवानांना कोंडून धुम ठोकली आहे. प्राताविधीच्या बहाण्याने संशयित शंकर चव्हाण याने इस्लामपूर (islampur) येथील उत्पादन शुल्कच्या कार्यालयातून पोबारा केला आहे. (sangli latest marathi news)

सांगली (sangli) जिल्ह्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावर येलूर फाटा येथे शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सापळा रचून कारवाई करत सहा लाख विदेशी दारूचा 51 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.या दारु तस्करी प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं होतं यामध्ये शंकर चव्हाण याच्यासह दोघा संशयितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (excise department) इस्लामपूर येथील वन कार्यालयात ठेवण्यात आले होते.

रविवारी सकाळच्या सुमारास प्रातर्विधीसाठी शंकर चव्हाण हे उठले. त्यानंतर त्यांनी प्रातर्विधी जायचे असे सांगत एका जवानास धक्का देत त्यांना उत्पादन शुल्कच्या कार्यालयात कोंडून ठेवले. चव्हाण यांनी या ठिकाणाहून पोबारा केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT