Omprakash Rajenimbalkar, International Yoga Day  saam tv
महाराष्ट्र

International Yoga Day : रामदेव बाबांना पण जमणार नाय... खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या याेगावर नेटिझन्सची झडतीय चर्चा (पाहा व्हिडिओ)

आज देशासह विदेशात जागतिक याेग दिन साजरा केला जात आहे.

Siddharth Latkar

omprakash rajenimbalkar news : याेग दिना निमित्त खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांनी याेग करतानाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यावर नेटीझन्स रामदेव बाबा यांना पण इतके योगाच्या स्टेप येत नसतील तितके योगा स्टेप खासदार साहेबांना येतात, मस्त साहेब, जबरदस्त साहेब अशा प्रतिक्रिया व्यक्त करु लागले आहेत. (Maharashtra News)

जागतिक योग दिनानिमित्त देश-विदेशात आज (बुधवार) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध जिल्हा क्रीडा संकूलात देखील लाेकप्रतिनिधींच्या उपस्थितीत योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांनी याेगा करतानाचा व्हिडिओ ट्विट (tweet) केला आहे. या व्हिडिओमध्ये राजेनिंबाळकर हे विविध आसन करीत आहेत. त्यांची आसनं पाहून नेटीझन्सच्या प्रतिक्रियांचा तुफान पाऊस पडत आहे.

काही नेटीझन्सनी तर त्यांना रामदेव बाबा पेक्षा भारी असं म्हटलं आहे. काहींनी फोटोसाठी केलेला एव्हेंट आणि रोजची प्रॅक्टिस यामध्ये फरक असतो.. ओमराजे असे म्हटलं आहे. खासदार फिट तर मतदारसंघ नीट..., खासदार फिट तरच जनता हिट असे म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षकांच्या वेतनात बदल, साताऱ्यात होणार IT पार्क; फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय

Smartphone 2026: 6500mAh बॅटरी अन् 50MP सोनी सेन्सर; दमदार फिचर्ससह Motorola Edge 70 Pro लाँच, किंमत वाचा

Maharashtra News Live Update: घायल हूँ, इसलिए घातक हूँ"..! ईडीच्या फेऱ्यातून कोर्टाने सुटका झाल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Riteish and Genelia: 'लालपरी'ला नवं ग्लॅमर! रितेशभाऊ अन् जिनिलिया वहिनी MSRTC चे नवे ब्रँड अॅम्बेसिडर

Beed : बीडमध्ये संतापजनक प्रकार! १६ वर्षीय मुलीचा बालविवाह, ६ महिन्यांच्या गरोदर पीडितेचा जबरदस्ती गर्भपात

SCROLL FOR NEXT