Kasara Ghat Fire News Saam TV
महाराष्ट्र

Kasara Ghat Fire News: जुना कसारा घाटात धावत्या कारने घेतला पेट; जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर नागरिकांची धावपळ

Fire News: मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कारने पेट घेतला त्यावेळी कार चालक कारमध्येच होता. आग लागल्याचे समजताच चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. तसेच प्रसंगावधान राखत

Ruchika Jadhav

Nahik News:

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई महामार्गावर जुन्या कसारा घाटात चालत्या कारने अचानक पेट घेतलाय. घाट चढून आल्यावर टोप बारव जवळ कारने पेट घेतला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीये.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कारने पेट घेतला त्यावेळी कार चालक कारमध्येच होता. आग लागल्याचे समजताच चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. तसेच प्रसंगावधान राखत सर्वांना बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

जुना कसारा घाट गेल्या एक तासापासून वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. १ तासापासून वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांचा मोठा खोळंबा झाला होता. त्यामुळे ही ट्रॅफिक आता नवीन कसारा घाटातून वळवण्यात आलीये.

सदर घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, रूट पेट्रोलिंग टीम, इगतपुरी नगर परिषदेचे अग्निशमन दल, टोल नाक्याचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे.

मध्य प्रदेशात बसला लागली भीषण आग

काल मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात रात्री डंपर ट्रकला धडकल्यानंतर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या आगीत 13 जणांचा होरपळून झाला. या अपघातात 17 प्रवासी जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

SCROLL FOR NEXT