candy crush, omraje nimbalkar, kailas patil, osmanabad news saam tv
महाराष्ट्र

हद्दच झाली राव! खासदार, आमदारांनी बाेलाविलेल्या बैठकीत अधिकारी खेळत हाेते कॅंडी क्रश

आजच्या बैठकीत काेणताच अधिकारी गांभीर्याने आला नव्हता हे दिसून आले.

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

उस्मानाबाद : उस्मानाबाद (osmanabad) जिल्ह्यात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (omraje nimbalkar) आणि आमदार कैलास पाटील (kailas patil) यांच्या उपस्थित आयाेजिलेल्या एका बैठकीत अधिकारी चक्क मोबाईलवर गेम्स (games) खेळणे, रेसिपी पाहणे, फेसबुकवर व्यस्त असल्याचे दिसून आले. यामुळे अधिकारी वर्गास बैठकीचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. (osmanabad latest marathi news)

उस्मानाबाद जिल्ह्यात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थित जिल्हास्तरीय दिशा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत खासदार आणि आमदार यांच्याकडून विविध विकास कामांचा आढावा घेण्यात येत होता. मात्र अधिकारी चक्क मोबाईलवर व्यस्त होते. कोणी रेसिपी पाहत होते तर काेण फेसबुकवर व्यस्त होते तर काही महिला अधिकारी या कँडी क्रश गेम खेळण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात विविध विकास कामे राबवण्यात येत आहेत मात्र ती कामे वेळेवर पूर्ण होत नसल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थित खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत देखील काेणी अधिकारी गांभीर्याने आला नव्हता असेच दिसून आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exercise For Healthy Heart: हेल्दी हार्टसाठी रोज किती वेळ व्यायाम केला पाहिजे? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मराठवाडा पदवीधर मतदार यादीत उद्धव ठाकरेंच्या नावावर आक्षेपार्ह मजकूर? ठाकरे गटाची तक्रार

Dinner Skip: १५ दिवस डिनर टाळलं तर वजन खरंच कमी होतं का? शरीरात होणारे ७ बदल जाणून घ्या

PF Rules 2026 : PF चे नियम बदलले! १५ ऑक्टोबरपासून CTC आणि टेक-होम सॅलरीत मोठे फेरबदल, पाहा तुम्हाला फायदा होणार की तोटा?

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

SCROLL FOR NEXT