ओबीसी नेत्यानो आरक्षण टिकवता येत नसेल, राजीनामा देऊन घरी बसा- बाळासाहेब सानप Saam Tv
महाराष्ट्र

ओबीसी नेत्यानो आरक्षण टिकवता येत नसेल, राजीनामा देऊन घरी बसा- बाळासाहेब सानप

ओबीसी संपवायचं काम करू नका अन्यथा ओबीसी तुम्हाला संपवल्या शिवाय शांत बसणार नाही

विनोद जिरे

बीड : ओबीसीच्या (OBC) मंत्री आणि जेष्ठ नेत्यांनो ओबीसीचे आरक्षण टिकवता येत नसेल, तर राजीनामा देऊन घरी बसा. संतप्त ओबीसी नेत्यानी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना इशारा दिला आहे. ओबीसीचे आरक्षण संपत असताना उघड्या डोळ्याने बघणाऱ्या सत्ताधारी पक्षातील ओबीसीचा नेता म्हणून घेणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.

हे देखील पहा-

आरक्षण संपत असताना तुम्ही शांत बसत असाल, तर ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून घरी बसवेल, असा इशारा ओबीसी व्हीजेएनटी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिला आहे. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली असताना, महाराष्ट्रातील ओबीसीचे नेते आणि मंत्री उघड्या डोळ्याने बघत आहेत. मात्र, त्यांचे ओबीसीकडे लक्ष नाही. स्वतःचा राजकारणासाठी फक्त ओबीसीचा वापर करून घेण्यासाठी हे नेते पुढे येतात.

आता आरक्षण संपुष्टात येत असताना जर तुम्ही शांत बसत असाल, तर ओबीसी समाज तुम्हाला घरी बसवल्या शिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील ओबीसींचे नेते म्हणत होते, की कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक होऊ देणार नाही. आता नगरपंचायत निवडणूक लागली आहे, मला असं वाटतं आहे. या महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्याना मंत्र्याना हे माहीत नाही का?

आता महाराष्ट्रातील ओबीसी जागृत झालेला आहे. हे विसरू नका. जर तुम्हाला शक्य होत नसेल, तर मला वाटत आपण राजीनामा देऊन घरात बसावं. ओबीसी संपवायचे काम करू नका, अन्यथा ओबीसी तुम्हाला संपवल्या शिवाय शांत बसणार नाही. असा इशारा ओबीसी वीव्हीजेएनटी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! बड्या ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुठे कोणाची नियुक्ती? वाचा

Shivali Parab: शिवाली परबचा नवा ग्लॅमरस लूक; सिल्व्हर बॅकलेस गाऊनमध्ये कल्याणच्या चुलबुलीचा जलवा

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Bedroom Vastu Tips: बेडरूममध्ये आरसा ठेवावा की नाही? वास्तुशास्त्र काय सांगते?

Fact Check : 5 रुपये नोटेच्या बदल्यात 51 लाख मिळणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT