Manoj Jarange - OBC  Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange - OBC : हिंमत असेल तर 288...; ओबीसी बांधवांचे मनोज जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज

Manoj Jarange news : ओबीसी बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. जरांगे यांच्या भूमिकेनंतर ओबीसींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

विनोद जिरे

बीड : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या राजकारणात डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक जाहीर होताच मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना खुले आव्हान दिले. मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान दिल्यानंतर ओबीसी बांधावांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सर्व मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरु केल्याची चर्चा आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र, त्यांनी राज्यात सर्व मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेनंतर ओबीसी बांधवांनी आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे. हिंमत असेल तर २८८ ठिकाणी उमेदवार उभे करा, पाडा,बघू कुणाचे पडतात, अस म्हणत ओबीसी बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

ओबीसी बांधवांनी काय प्रतिक्रिया दिली?

मनोज जरांगे पाटील हे काही दिवसांत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. यावर ओबीसी बांधवांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'हिंमत असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी २८८ ठिकाणी उमेदवार उभे करावेत, त्यांनी स्वत: उभ राहावं. पाडायचे तर पाडा, बघू कोण कोणाला पाडतंय, तर आम्हाला माहिती आहे की, जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोण आहेत? ते बारामतीचे आहेत'.

'बारामतीत ओबीसीचा आमदार होणार आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचाच बघावं, मात्र आता आम्ही गेवराईत परिवर्तन करणार आहोत. मातब्बरांना आम्ही दे धक्का देणार आहोत. आम्ही या गेवराई विधानसभा मतदारसंघात 70 टक्के आहोत, मात्र अद्यापपर्यंत आमचा येथे आमदार नाही. यावेळेस मात्र या ठिकाणी आम्ही ओबीसीचाच आमदार करणार आहोत, असा निर्धार आता मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेनंतर ओबीसी बांधवांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारताचा विद्यार्थी एकटा नाही! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार गांधी स्मृतिस्थळी

Women Purse : महिलांनी प्रवास करताना पर्समध्ये 'या' ६ वस्तू कधीच ठेवू नयेत, जाणून घ्या कारण नाहीतर....

Mumbai Tourism : १८७५ पासून मुंबईची ओळख जपणारा 'हे' ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

CJP आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या निवासस्थानी 'इंडिया' आघाडीची बैठक; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये सायबर पोलिसांची मोठी कारवाई, १२ 'म्युल अकाउंट्स'विरोधात गुन्हा; बँक खाते भाड्याने द्यायचे अन्...

SCROLL FOR NEXT