ओबीसी समाज आंदोलनाच्या तयारीत विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडमध्ये आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक

राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असतांना आता ओबीसी समाजही आंदोलनाच्या तयारीत दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी Maratha Reservation आक्रमक झाला असतांना आता ओबीसी OBC समाजही आंदोलनाच्या तयारीत दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी आता समाज एकवटू लागला आहे. यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समता परिषद भव्य आक्रोश आंदोलन करणार आहे अशी माहिती समता परिषदेचे बीड Beed जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांनी दिली आहे. OBC community aggressive over reservation in Beed

मराठा समाजाला आरक्षण द्यावं मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये. अशी भूमिका आधीपासून सर्व ओबीसी नेत्यांची राहिली आहे. मात्र आता आरक्षण वाचविण्यासाठी तसंच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार हे आंदोलन केले जाणार आह अशी माहिती सुभाष राऊत यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

तर समता परिषदेकडून आज सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाणार असून यावेळी धुळे -सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग अडवला जाणार आहे.यावेळी कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन केलं जाणार आहे अशी माहिती देखील सुभाष राऊत यांनी दिली आहे. OBC community aggressive over reservation in Beed

दरम्यान मराठा आरक्षणासाठीचा राज्यातील पहिला मोर्चा बीडमध्येचं झाला होता.त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचं आरक्षण रद्द झाल्यानं आज ओबीसींचा आक्रोश हा बीडमध्ये दिसणार आहे. यामुळे या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

SCROLL FOR NEXT