OBC जनगणना । केंद्र सरकारविरोधात मुंडन आंदोलन अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

OBC जनगणना । केंद्र सरकारविरोधात मुंडन आंदोलन

ओबीसी जनगणना व रद्द झालेले राजकीय आरक्षण आदी मुद्द्यांवर हे आंदोलन करण्यात आले.

अभिजीत घोरमारे

भंडारा - ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी व ओबीसी जनगणनेला विरोध करणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ ओबीसी क्रांति मोर्चाच्या वतीने भंडारा शहराच्या त्रिमूर्ति चौकात मुंडन आंदोलन करण्यात आले असून ओबीसी क्रांति मोर्चा संघटनेचे संयोजक संजय मते यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

हे देखील पहा -

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ओबीसी जातीनिहाय जनगणनेला विरोध करणारे वक्तव्य अधिवेशनात केले आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी ओबीसी क्रांती मोर्चा मुंडन आंदोलन करून मोदी सरकारविरोधात आपला रोष व्यक्त करत असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

ओबीसी बांधवांच्या उत्थानासाठी जातिनिहाय जनगणना गरजेची आहे. मात्र, केंद्र सरकारने याला तीव्र विरोध दर्शविला आहे. यासोबतच ओबीसी चे पदोन्नती आरक्षण व राजकीय आरक्षण रद्द करण्याचे षडयंत्र देखील केंद्र सरकारचेच असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याच्याच निषेधार्थ आणि ओबीसी समाजाचे रद्द करण्यात आलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ओबीसी क्रांती मोर्चाने हे मुंडन आंदोलन केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भारतीय क्रिकेटपटूच्या भावाविरोधात गुन्हा दाखल, केबिन क्रू महिलेने केले गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT