Manoj Jarange Patil  Saam tv
महाराष्ट्र

OBC Vanjari Protest: मनोज जरांगे, सुरेश धस यांना अटक करा; पुण्यात पोलसी स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

OBC Vanjari Protest: संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला त्रास दिला तर, घुसून मारू, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील परभणीच्या मोर्चात म्हणाले होते. याच खळबळजनक वक्तव्याच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेत.

Bhagyashree Kamble

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला त्रास दिला तर, घुसून मारू, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील परभणीच्या मोर्चात म्हणाले होते. याच खळबळजनक वक्तव्याचे पडसाद अनेक गावात उमटले असून, पुण्यातील ओबीसी आणि वंजारी समाज आक्रमक झाले आहेत. सुरेश धस, अजंली दमानिया आणि मनोज जरांगे सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान करत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी ओबीसी आणि वंजारी समाजाने आंदोलन करत घोषणाबाजी केलीय.

सुरेश धस, अंजली दमानिया आणि मनोज जरांगे सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान करत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात वंजारी समाज आक्रमक झाले असून, शिवाजीनगर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन सुरू केलंय. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना समाजाने निवेदन देत पोलीस स्टेशनबाहेर घोषणाबाजी केलीय. जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

तसेच, राज्यात एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून अंजली दमानिया, सुरेश धस आणि मनोज जरांगे सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप ओबीसी कार्यकर्ता बाळासाहेब सानप आणि मंगेश ससाने यांनी केलाय. जरांगे नेमकं कुणाच्या घरात घुसून मारणार, हे त्यांनी जाहिर करावं, असा प्रश्न देखील सानप यांनी उपस्थित केलाय.

संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे. मात्र जरांगे आणि जातीयवाद निर्माण करत आहेत. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी वंजारी समाजानं केलीय. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचं कारण काय? प्रत्येक मंत्र्याला कार्यकर्ता असतो. कार्यकर्ता चुकला म्हणजे लोकप्रतिनिधी चुकतो असं नाही. असं म्हणत वंजारी समाजाने जरांगेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT