Nagpur; मांजाने चिरला बँक अधिकाऱ्याचा गळा... Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur; मांजाने चिरला बँक अधिकाऱ्याचा गळा...

रस्त्याने जात असताना नायलॉन मांजा गळ्यामध्ये अडकल्यामुळे एका निवृत्त बँक अधिकाऱ्याचा गळा कापल्याची घटना घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर: रस्त्याने जात असताना नायलॉन मांजा (nylon manja) गळ्यामध्ये अडकल्यामुळे एका निवृत्त बँक अधिकाऱ्याचा (bank officer) गळा कापल्याची घटना बेसा चौकामध्ये घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. घटनेच्यावेळी निवृत्त बँक व्यवस्थापक प्रकाश पोटे (वय-६२) हे आपल्या नातेवाइकांची भेट घेऊन घरी जात होते. थंडीमुळे त्यांनी आपल्या गळ्यात मफलर बांधला होता. बेसा चौकाकाढून जात असताना अचानक त्यांच्या गळ्याला मांजा (manja) अटकला. काही कळण्याअगोदरच नायलॉन मांजाने मफलर कापून त्यांचा गळा चिरला आहे.

हे देखील पहा-

पोटे यांच्या हा प्रकार लक्षात येईपर्यंत त्यांचा गळा रक्तबंबाळ झाला होता. लगेच त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये (hospital) नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या गळ्यावर ७ टाके लावले आहेत. नायलॉन मांजा (nylon manja) बाळगण्यास आणि विकण्यास प्रतिबंध असताना देखील पतंग उडविणाऱ्यांच्या हातात नायलॉन मांजा येतो कुठून? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनी (police) विक्रेत्याबरोबर नायलॉन मांजाने पंतग उडविणाऱ्यांवर देखील कारवाई (Action) करायला हवी, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे.

मागील १५ वर्षांच्या आकडेवारीत लक्ष वेधल्यास राज्यात (state) १८२ जणांचे नायलॉन मांजाने बळी घेतले आहे. तर उपराजधानीमध्ये ३८ जणांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे. पशू- पक्षांसह मानवाकरिता प्राणघातक असलेल्या मांजावर संपूर्णपणे बंदी घालणे आवश्‍यक आहे. अन्यथा धागा मांजाच्या नावावर चक्क नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT