प्रकाश आंबेडकर Saam Tv
महाराष्ट्र

आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून सत्य परिस्थिती समोर आणावी - प्रकाश आंबेडकर

मंगेश मोहिते

नागपूर - महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांसंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून वक्तव्य करावे आणि सत्य परिस्थिती समोर जनतेसमोर आणावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर त्यांचे अनेक सहकारी बेपत्ता असल्या संदर्भात केलेला आरोप. तसेच नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने किंवा गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. तर मुख्यमंत्र्यांनीच या संदर्भातली खरी परिस्थिती लोकांसमोर मांडावी असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे देखील पहा -

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक ठेवण्याचे प्रकरण असोत किंवा शंभर कोटी रुपये वसुलीचे प्रकरण. सचिन वाजे मुख्य आरोपी असल्यामुळे माफीचे साक्षीदार होऊ शकत नाही. त्याएवजी या प्रकरणी अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुखच माफीचा साक्षीदार झाले पाहिजे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. याप्रकरणी राज्य आणि केंद्रातल्या तपास एजन्सीज नीट तपास करत नाही आहे. तसेच प्रकरण न्यायाधीशांसमोर असल्यामुळे आता त्याचा नीट तपास व्हावं आणि सत्य समोर यावं ही जबाबदारी न्यायाधीशांची आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याची आमची इच्छा असून तसा प्रस्ताव एक महिन्यापूर्वी पासून काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडे दिलेला आहे. मात्र एक महिना उलटूनही काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने राज्यात सर्वत्र कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान अजून निवडणुकांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडीचा आमचा प्रस्ताव अजूनही कायम असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT