Sugarcane factory Saam TV
महाराष्ट्र

Sugar Factories: दोन माजी सहकारमंत्र्यांसह मातब्बर नेत्यांच्या कारखान्यांना साखर सहसंचालकांनी बजावली नोटीस; जाणून घ्या कारण

या नाेटीसीची शेतक-यांसह राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

भारत नागणे

Pandharpur News :

उसाचा गाळप हंगाम सुरू करूनही त्याची माहिती साखर सहसंचालकांना न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या कारखान्याचा समावेश आहे. त्यामुळे या नोटिशीची चर्चा रंगली आहे. (Maharashtra News)

ऊसगाळप हंगामाची सुरुवात केल्यानंतर दैनंदिन ऊस,साखर आणि इतर उपपदार्थ उत्पादनाची माहिती साखर सहसंचालकांना देणे कारखाना प्रशासनाला बंधनकारक असते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांनी त्याबाबतची माहिती दिली नसल्याचे या नोटिशीवरून उघड होत आहे.

लोकमंगल साखर कारखाने हे माजी सहकारमंत्री तथा भाजप नेते सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित आहेत. सहकार शिरोमणी वसंतराव काळे हा कारखाना अजित पवार राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, मातोश्री लक्ष्मी हा काॅग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सांगोला सहकारी साखर कारखाना हा शरद पवार गटाचे अभिजित पाटील यांचा तर बार्शी तालुक्यातील इंद्रेश्वर कारखाना हा माजी सहकारमंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे यामध्ये दोन माजी सहकारमंत्र्यांच्या कारखान्यांचा समावेश आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छामरण; जीवंतपणीच्या मरणयातना कधी थांबणार? VIDEO

शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

SCROLL FOR NEXT