Aaditya Thackeray saam tv
महाराष्ट्र

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या गाडीवर एकही दगड फेकला गेला नाही, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा मोठा दावा

Aaditya Thackeray News: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र देखील लिहिले होते.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Aurangabad News : शिवसेनेचे आमदार आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर मंगळवारी दगडफेक झाल्याची घटना समोर आली होती. यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र देखील लिहिले होते. परंतु आता औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आदित्य ठाकरेंच्या गाडीवर एकही दगड फेकला गेला नाही असा मोठा दावा केला आहे.

थोडा गोंधळ झाला पण दगडफेक नाही - पोलीस

शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीवर औरंगाबाद पोलिसांचा मोठा खुलासा केला आहे.

आदित्य अथवा विधान अंबादास दानवे यांच्या गाडीवर एकही दगड फेकला गेला नाही, थोडा गोंधळ झाला पण दगडफेक झाली नाही, अशी माहिती औरंगाबाद ग्रामीणचे ॲडिशनल एसपी सुनिल लांजेवार यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेचे आमदार आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे राज्यभरात शिवसंवाद यात्रा साधत आहेत. आदित्य ठाकरेंची संवाद यात्रा औरंगाबादेतील महालगावात असताना सभेच्या ठिकाणी गोंधळ झाल्याची घटना समोर आली होती. आदित्य ठाकरे यांचा संवाद यात्रेचा कार्यक्रम आणि या परिसरात निघालेली रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली.

अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्याने जमावाने या ठिकाणी किरकोळ दगडफेक केल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप देखील केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT