महाराष्ट्रात कोरोनाच्या AY-4 व्हेरिएंटचा एकही रुग्ण नाही - राजेश टोपे लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाच्या AY-4 व्हेरिएंटचा एकही रुग्ण नाही - राजेश टोपे

जलदगतीने महाराष्ट्रात लसीकरण करण्याच्या सूचना - टोपे

लक्ष्मण सोळुंके

जालना - महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कोरोनाच्या AY-4  व्हेरियंटचा शिरकाव झाला नसून हा शिरकाव महाराष्ट्रात होऊ नये म्हणून आरोग्य विभागाला योग्य सूचना केल्या जातील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते. केंद्राच्या टास्क फोर्सने जलदगतीने लसीकरण करण्याच्या सूचना राज्यांना केल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

मिशन कवचकुंडल अंतर्गत महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत वेगाने लसीकरण केलं जाणार असल्याचे देखील ते म्हणाले. लसीकरण वेगाने होण्यासाठी आणखी काही विभागाची मदत घेतली जाणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.सध्या दोन डोस मधील अंतर 84 दिवसांचे आहे. या दोन डोस मधील अंतर कमी करण्याचा केंद्राचा मानस नाही त्यामुळे हे अंतर तसेच कायम राहील असंही ते म्हणाले. दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 2-3 दिवसांत अर्थ विभागाकडे पाठपुरावा करून प्रयत्न केले जाणार असल्याचे देखील टोपे यांनी सांगितले.

दरम्यान,इंदौरमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग तपास अहवालात कोरोनाचे AY-4 चे नवीन व्हेरिएंट आढळून आले आहे. हा डेल्टाचाच एक नवीन व्हेरिएंट असल्याचे बोलले जात आहे.इंदौरसह मध्य प्रदेशातून नवी दिल्लीत पाठवण्यात आलेल्या नमुन्याच्या चाचणी अहवालात नव्या व्हेरिएंटची आतापर्यंत 7 प्रकरणे आढळून आली आहे. 

इंदौरमध्ये सध्या दररोज १ ते २ कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. 16 ऑक्टोबरच्या अहवालात ७ नमुन्यांमध्ये हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यापैकी तीन महू, दोन जण न्यू पलासिया आणि एक दुबेची बाग येथील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान,१ ऑक्टोबर पर्यंतच्या अहवालात, १३ नमुन्यांपैकी एका नमुन्यात AY-4 आणि चार नमुन्यांमध्ये AY-12 व्हेरिएंट आढळून आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: पोलिस दलात खळबळ! बीडमध्ये ACBची मोठी कारवाई, २ पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Skincare Tip: स्किन केअरसाठी सोपा उपाय! दररोज रात्री हे तेल लावल्याने त्वचेला मिळतो नॅचरल ग्लो

LPG gas alternatives: LPG चा तुटवडा? स्वयंपाकासाठी गॅसला हे 5 पर्याय ठरू शकतात फायदेशीर

Cold Panipuri Recipe: मुंबईची स्पेशल चटपटीत थंड पाणीपुरी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT