एसटीला पुन्‍हा ब्रेक! जिल्ह्यातील आगारांतून बाहेर पडली नाही एकही बस संजय जाधव
महाराष्ट्र

एसटीला पुन्‍हा ब्रेक! जिल्ह्यातील आगारांतून बाहेर पडली नाही एकही बस

एसटी सेवा ठप्प, प्रवाशांचे हाल 30 ते 35 लाख रुपयांचे होत आहे नुकसान...

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. ऐन दिवाळीत या आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. सातही आगारांनी टप्प्याटप्पाने या कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्याने ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील एकाही आगारातून बस बाहेर पडली नाही. त्यामुळे काल दिवसभरात बुलडाणा विभागाचे ३० ते ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्त्यात वाढ करावी. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागण्या कर्मचाऱ्यांनी रेटून धरल्या आहेत. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. मात्र, तरीही सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील चिखली आणि खामगाव येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी ५ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले. तर 6 नोव्हेंबर रोजी मेहकर आगारातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनात उडी घेतली आहेत.

हे देखील पहा-

काल बुलडाणा, मलकापूर, जळगाव जामोद, शेगाव या आगारातील कर्मचाऱ्यांनीही कामबंद आंदोलनात उडी घेतल्याने काल दिवसभरात एकही बस आगाराच्या बाहेर निघाली नाही. एसटी कर्मचारी नित्याप्रमाणे कामावर हजर झाले आहेत. मात्र, त्यांनी गाड्या बाहेर काढण्यास नकार दिल्याने एसटी बसस्थानकावर प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. यामध्ये मात्र खासगी वाहतूकदारांची दिवाळी झाल्याचे दिसून आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांनी अव्वाच्या- सव्वा भाडे आकारून वाहतूक सुरू केली आहे.

खासगी काळ्या पिवळ्या, ऑटो, थेट एसटी बसस्थानकात घुसून प्रवासी गोळा करत होते. नाईलाजास्तव प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. बुलडाणा विभागाकडे सध्या ४३४ बसेस आणि सुमारे अडीच हजार कर्मचारी आहेत. दिवसाला २५०० फेऱ्या होतात. त्यातून एसटी महामंडळाला ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. आज जिल्ह्यातील सातही आगारातील कर्मचारी संपावर गेल्याने ३० ते 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pomegranate Vs Dragon Fruit : डाळिंब vs ड्रॅगन फ्रूट ? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

मनोज जरांगे पाणी प्यायले, पण उपोषणावर ठाम; नेमकी चर्चा काय अन् निर्णय काय झाला?

जरांगेंची तब्येत बिघडली, आंदोलन चिघळणार? राज्यभरात जरांगेंचे समर्थक रस्त्यावर

Fact Check: महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद? NCMC कार्ड नसलेल्या महिलांना फूल तिकीट?

Google Gemini : हवी ती फ्रेम, हवा तो सीन आणि हवा तसा टकाटक व्हिडिओ...Gemini चं नवं फीचर करणार मार्केट जाम!

SCROLL FOR NEXT