परभणी जिल्ह्यात 'No Vaccine No Entry" जिल्ह्याच्या वेशीवर होणार तपासणी Saam TV
महाराष्ट्र

परभणी जिल्ह्यात 'No Vaccine No Entry" जिल्ह्याच्या वेशीवर होणार तपासणी

शिवाय त्याच ठिकानी लसीकरणची सुविधा ही मिळणार आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राजेश काटकर

परभणी : साऊथ आफ्रिकेतून (Sauth Africa) आलेला कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन व्हेरीयंट हा भारतासाठी ही आता चिंतेचा विषय ठरत आहे. राज्य शासनाने त्यासाठी नवीन दिशा निर्देश जारी केले आहेत. परभणी जिल्हा प्रशासन ही या संभाव्य धोक्यासाठी सज्ज झाला असून उद्यापासून जिल्ह्यातील सर्व प्रमुख इंट्री पॉईंटवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. इतर राज्यातून आणि इतर जिल्ह्यातून परभणीत दाखल होऊ पाहणाऱ्यांना आता RT-PCR टेस्ट आणि लसीशिवाय जिल्ह्यात एन्ट्री मिळणार नाही.

शिवाय त्याच ठिकानी लसीकरणची सुविधा ही मिळणार आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवाय कोविडच्या या नवीन व्हेरीयंटचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून , जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी गोयल यांनी केले. जनतेने काळजी न घेतल्यास यापुढे जिल्ह्यात एन्ट्री बंद करण्याचा पर्याय खुला असल्याचे ही श्रीमती गोयल यांनी सांगितले , त्यामुळे येणाऱ्या दिवसात परभणीकरांनी पुरेपुर काळजी घेतली नाही, आणि नियमांची पायमल्ली केल्यास येणारे दिवस हे परभणीकरांसाठी सक्तीचे ठरू शकतात.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : आयर्नची कमतरता फक्त महिलांमध्येच नाही, तर पुरुषांनीही जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

Private Bus Fares: टॅव्हल्सचा मनमानी कारभार, दिवाळीत प्रवाशांची लूट सुरू; पुणे ते नागपूर प्रवासासाठी ₹4200 भाडे

Maharashtra News Live Update: अंधेरी स्थानकात तिकीट तपासनीसाला महिला प्रवाशाने चावा घेतला!

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचं पुन्हा नशीब चमकलं! मिळाली टी-२० टीमची कॅप्टन्सी, आता दोन ट्रॉफी जिंकण्याचं लक्ष्य

Rmayana Review: 'रामायण' थिएटरमध्ये का पाहावा? रणबीर कपूरचा अभिनय, यशचा रुबाब आणि चित्रपटातील 'या' खास गोष्टी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT