no power in satpuda from 12 days near nandurbar  saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : सातपुड्यातील मोलगी गावात 12 दिवसांपासून बत्ती गुल, ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे हाल

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News :

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील मोलगी गावात गेल्या 12 दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. बत्ती गुल झाल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे हाल हाेताहेत. प्रशासनाने तातडीने यामध्ये लक्ष घालून विद्युत पूरवठा सुरळीत करावा अशी मागणी हाेऊ लागली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या गावात गेल्या 12 दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये विजेची समस्या नेहमी उद्भवत असतात. परंतु गेल्या बारा दिवसापासून वीजपुरवठा होत नसल्याने या परिसरातील वीजे अभावी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास अडचण होत आहे.

विद्युत पूरवठा नसल्याने ऑनलाइनच्या कामासोबत शेतकऱ्यांचे काम रखडले आहेत. या भागातील विजेची समस्या दूर व्हावी यासाठी सुरवाणी येथील 132 के.व्ही. क्षमतेचे वीज उपकेंद्र (सबस्टेशन) सुरू करण्यात आले आहे. (Maharashtra News)

तरीही मागील वर्षाप्रमाणे यंदाही ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना या विजेच्या समस्येचा मोठा फटका बसत आहे. महावितरण कंपनीकडून विज पुरवठा कधी सुरळीत होणार यासाठी कोणीही उत्तर द्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: कोण होणार बिग बॉस मराठी सीझन ५ चा विजेता? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, एकमताने पुण्यात निवड

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

SCROLL FOR NEXT