State government to record individual shares of co-owners in joint farmland on 7/12 extract under special revenue drive. saam tv
महाराष्ट्र

Farm Land: आता जमिनीवरून नाही होणार वादावादी; सामाईक शेतजमिनी होणार शेतकऱ्यांच्या नावावर

Joint Farmlands : महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ च्या कलम ८५ अंतर्गत ७/१२ च्या उताऱ्यावर संयुक्त शेतजमिनींमधील सह-मालकांच्या वैयक्तिक वाट्यांची नोंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

Bharat Jadhav

  • सामाईक शेतजमिनीतील हिश्शे स्वतंत्रपणे नोंदवले जाणार.

  • कलम ८५ अंतर्गत विशेष मोहीम राबवण्याचे आदेश.

  • सातबारा उताऱ्यावर प्रत्येक खातेदाराचे क्षेत्र नमूद होणार.

राज्यातील ज्या शेतजमिनीवर एकापेक्षा जास्त खातेदार म्हणजेच सहहिस्सेदारआहेत, अशा सामाईक खात्यांमधील प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर त्याच्या हिश्श्याची जमीन स्वतंत्रपणे नमूद करण्यासाठी सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ नुसार विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिलेत. या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावरील प्रत्येक खातेदाराच्या नावासमोर क्षेत्र नमूद केले जाणार आहे.

शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आयडी कृषी विभागाच्या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापरणे आवश्यक असणार आहे. फार्मर आयडी तयार करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि पीक पाहणी,जमीन खरेदी-विक्री किंवा फेरफार नोंद करताना होणारा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक हिस्सेदाराचे क्षेत्र त्याच्या नावापुढे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतलाय.

खाते विभाजनासाठी तालुका आणि मंडळस्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. हिस्सेदारांना विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. यासाठी प्रशासनाकडून लेखी व सार्वजनिक आवाहन केले जाणार आहे. खाते विभाजनाची ही प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि ठराविक वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मोहिमेचा जास्तीत जास्त प्रचार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना यात सहभागी करुन घेण्याचे उद्दिष्ट आहे.

यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या जमिनीच्या हिश्श्यानुसार स्वतंत्र ओळख क्रमांक मिळेल. कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभथेट आणि विनाअडथळा मिळणं शक्य आहे. खरेदी-विक्री करताना किंवा पीक कर्ज घेताना होणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होतील. ई-पीक पाहणीची नोंद करताना स्वतःच्या हिश्शाच्या जमिनीची अचूक नोंद करता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

Chhattisgarh : ३६ किल्ल्यांची भूमी छत्तीसगड! भारतात लपलेला ऐतिहासिक खजिना, तुम्ही कोण-कोणते किल्ले पाहिलात?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Good News : LPG दरात झाली मोठी घट, ऑटो चालकांना मोठा दिलासा, पाहा आता किती रूपयांना मिळणार?

पांढरे केस होतील काळे! तुरटी आणि आवळ्याचा 'हा' सोपा उपाय ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT