सावधान! कागदपत्रे सोबत नसतील तर तुमची गाडी होईल जप्त जयेश गावंडे
महाराष्ट्र

सावधान! कागदपत्रे सोबत नसतील तर तुमची गाडी होईल जप्त

अकोल्यात वाढत असलेले मोटारसायकल चोरीचे गुन्हे व चेन स्नॅचिंग च्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने कागदपत्रे जवळ न बाळगता गाडी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यात वाढत असलेले मोटारसायकल चोरीचे गुन्हे व चेन स्नॅचिंग च्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने कागदपत्रे जवळ न बाळगता गाडी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. No documents with you then your bike will be confiscated

तुमच्या जवळ तुमच्या गाडीचे कागदपत्र सोबत नसतील, मोबाईल मध्ये DG लॉकर किंवा तत्सम अधिकृत अँपवर स्कॅन कॉपी न ठेवता वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांची वाहने वाहतूक कार्यालयात जमा करून ठेवण्याची मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे. सहा महिन्यांत पोलिसांनी तब्बल 2900 वाहनांवर कारवाई करत ती वाहने जप्त केली आहेत.

हे देखील पहा -

वाहनांची कागदपत्रे पडताळून नंतरच दंडात्मक कारवाई करून सोडण्यात येत आहेत. ह्या मोहिमेचे फलित म्हणून आता पर्यंत 3 दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून त्या पैकी 2 अकोला शहर व एक गाडगे नगर अमरावती येथील आहेत. आता पर्यंत एकूण 2900 दुचाकी वाहतूक कार्यालयात जमा करण्यात आल्या होत्या. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या वाहनांची पूर्ण पडताळणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

मोटारसायकल चोरीवर आळा बसावा व चेन स्नॅचिंग च्या घटनांवर आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशाप्रमाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार ही मोहीम राबवित आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: प्रत्येक महिलेमध्ये असायला हवेत हे 5 गुण; चाणक्यांचे विचार बदलू शकतात आयुष्य

Maharashtra News Live Update: शिरपूरमध्ये सोसाट्याच्या वारासह झालेल्या जोरदार पाऊस

Operation Tiger: मातोश्रीबाहेर शिंदेसेनेची बॅनरबाजी, ६ खासदारांच्या प्रवेशानंतर ठाकरेंना डिवचलं; पाहा VIDEO

ज्यांचं नाव लागेल तेच खरे नशीबवान! घराचं स्वप्न कोणाचं पूर्ण होणार? 13 फ्लॅट्ससाठी 17,755 अर्जदारांचे नशीब पणाला

Tuesday Horoscope : नोकरीच्या समस्या सुटणार, 5 राशींवर होणार धनवर्षाव; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT