Khandoba, Jejuri saam tv
महाराष्ट्र

Jejuri Khandoba Mandir : खंडोबारायाच्या दर्शनासाठी जेजुरीला निघालात? भाविकांसाठी असे असेल बंधन

गडामध्ये कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण नाही असे सांगण्यात आले.

मंगेश कचरे

Jejuri Khandoba News : अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य स्वयंभू लिंगाचा व घोड्याचा गाभारा उद्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना बंद राहणार आहे. या काळात गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. यामुळे भाविकांना दोन्ही गाभाऱ्यात जाता येणार नाही. (Maharashtra News)

जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबा गड जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू आहेत. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना केल्या जात आहेत.

यासाठी सुमारे १०७ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. सध्या ५ ऑक्टोंबरपर्यंत गाभारा दुरूस्तीचे काम चालणार आहे. त्यामुळे भाविकांना गाभा-यातून दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान गडामध्ये कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण नाही अशी माहिती मंगेश घोणे (विश्वस्त, खंडोबा देवस्थान) आणि गणेश आगलावे (मुख्य पुजारी, जेजुरी देवस्थान) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Maharashtra News Live Update: जरांगे पाटलांच्या आंदोलनावर शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण; म्हणाले, “त्यांना अर्धसत्य माहिती मिळतेय”

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Pink Sauce Pasta Recipe: रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी आणि चटपटीत 'पिंक सॉस पास्ता' घरीच बनवा; वाचा रेसिपी

Disha Salian Death Case: मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात ६ वर्षांनंतर गुन्हा दाखल, मृत्यूमागचं रहस्य उलगडणार

SCROLL FOR NEXT