Nitin Karir  Saam Tv
महाराष्ट्र

MHA Chief Secretary : महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नितीन करीर यांची नियुक्ती

Nitin Karir : सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आज ३१ डिसेंबर २०२३ ला निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नितीन करीर यांची नियुक्ती केली जाणार आहे.

Bharat Jadhav

Chief Secretary of Maharashtra:

नितीन करीर यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलीय. १९८८ च्या बॅचचे IAS असलेले नितीन करीर हे सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. थोड्याच वेळात ते सीएस मनोज सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारला.(Latest News)

सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आज ३१ डिसेंबर २०२३ ला निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नितीन करीर यांची नियुक्ती केली जाणार आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळातील काही सदस्य नितीन करीर यांना सचिव पद द्यावे यासाठी आग्रही होते. काही मंत्र्यांनी नितीन करीर यांना मुख्य सचिव पदासाठी संधी दिली जावी, यासाठी मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार(AJit Pawar) यांच्याकडे चर्चा केली होती, माहिती सूत्रांनी दिलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नियुक्तीपूर्वी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. करीर यांनी महसूल आणि वने तसेच नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केलंय. २०२०च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान करीर यांच्यावर महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

डॉ. करीर हे एमबीबीएस असून १९८८ मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सांगली, पुणे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालक, नोंदणी महानिरीक्षक, पुणे महापालिका आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळलीय. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, विक्रीकर आयुक्त, जमाबंदी आयुक्त या पदावरही काम केलंय. दरम्यान माजी मुख्य सचिव मनोज सौनिक हे यांनी मुदतवाढीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे पत्र व्यवहार केला होता. मात्र, केंद्रानं त्या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

SCROLL FOR NEXT