nitin gadkari 
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणसाठी 100 कोटींचा निधी : नितीन गडकरी

Siddharth Latkar

साताार : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल वाहून गेले. काही ठिकाणी रस्त्यांना माेठ माेठ्या भेगा पडल्या तर काही ठिकाणी भूस्खलनच झाले. यामुळे गावांचा कित्येक दिवस संपर्क तुटला. या वाहून गेलेल्या किंवा खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ही कामे तात्काळ सुरु करण्यात आल्याचे ट्वीट गडकरी यांनी केले आहे.

या १०० काेटींमध्ये ५२ कोटी रुपये हे तात्पुरत्या डागडुजीसाठी आहेत. तसेच ४८ कोटी रुपये हे (पक्क्या) कायमच्या दुरुस्त्या आणि बांधकामासाठी असल्याचे गडकरी nitin gadkari यांनी नमूद केले आहे.

याबराेबरच मुंबई-गोवा महामार्गावरील mumbai goa highway चिपळूण नजीकच्या वाशिष्ठी नदीवरचा पूल देखील पावसामुळे खराब झाला होता. त्याची दुरुस्ती तताडीने म्हणजेच ७२ तासात करुन तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असेही गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

परशुराम घाट, कारूळ घाट, आंबा घाट इथे रस्त्यात आलेले अडथळे देखील दूर करण्यात आले आहेत. तात्पुरत्या स्वरुपातील दुरुस्तीची कामे यापुर्वीच हाती घेण्यात आली आहेत. पक्की (कायमची) दुरुस्तीची कामे करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

nitin-gadkari-tweets-100 crore-sanctioned-restoration-roads-kokan-western-maharashtra-affected-by-unprecedented-rains-sml80

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll : सांगलीत भाजप मारणार बाजी? एक्झिट पोलमध्ये कौल कुणाला?

Maharashtra Exit Poll : काँग्रेसचा गड अपक्ष भेदणार? एक्झिट पोलच्या अंदाज काय?

SCROLL FOR NEXT