नितीन गडकरींनी लावले कार्यकर्त्याच्या जॅकेटचे बटन्स; पहा Video Saam Tv
महाराष्ट्र

नितीन गडकरींनी लावले कार्यकर्त्याच्या जॅकेटचे बटन्स; पहा Video

वीज निर्मिती प्रकल्पात बांबूचा वापर झाल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना (Farmer) मोठा फायदा होईल तसंच फ्लेक्स इंजीन वाहनांना लावण्यासंदर्भात आजचं ॲार्डर निघाली आहे.

संजय डाफ

नागपूर : रंगीत कापसापासून तयार केलेलं जॅकेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कृषी प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात भेट देण्यात आलं. हे जॅकेट नितीन गडकरी यांनी धोटे या भाजपच्या कार्यकर्त्याला भेट दिलं आणि त्या जॅकेटच्या बटन्स स्वतः गडकरी यांनी लावून दिले. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून या घटनेचं स्वागत केलं आहे. दरम्यान आज नितीन गडकरी (Nitin Gadkari) नागपुरात ॲग्रोव्हीजन कृषी प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थीत होते.

वीज निर्मिती प्रकल्पात बांबूचा वापर झाल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना (Farmer) मोठा फायदा होईल तसंच फ्लेक्स इंजीन वाहनांना लावण्यासंदर्भात आजचं ॲार्डर निघाली आहे. पेट्रोल इंजीन बनवणाऱ्या कंपन्यांची दिल्लीत (New Delhi) लवकरंच बैठक घेऊन त्यांना तीन चार महिन्यात फ्लेक्स इंजीन तयार करण्यास सांगणार असून शेतकऱ्यांच्या मुलांनीच इथेनॅालचे पंप चालवावे, गावातील तरुणाला रोजगार मिळाला तर गावाची आर्थिक स्थिती सुधारेल, असं गडकरी म्हणाले. नागपूरात तेलंखडी गार्डन परिसरात ॲग्रो कन्वेशन सेंटर तयार करणार असल्याचंही त्यांनी सांगीतलं. “फुकटंच कुणाला काहीच द्यायचं नाही, नाही तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे. त्यामुळेच कृषी प्रदर्शनात यायला मोफत बसेस दिल्यास नाही” असंही यावेळी गडकरी म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT