nitesh rane 
महाराष्ट्र

संजय राऊतांनी माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे : नितेश राणे

अनंत पाताडे

सिंधूदुर्ग : काेण राणे असे विचारणा-या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर केंद्रीय मंत्री नाराण राणे narayan rane यांच्या दाेन्ही मुलांनी ट्विटच्या माध्यमातून प्रहार सुरु केला आहे. दाेन्ही राणे पुत्रांनी राऊतांवर एकेरी भाषेत टीका करण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान नितेश राणे nitesh rane यांनी खासदार संजय राऊत sanjay raut यांना नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याबाबत काही प्रश्नांची उत्तरे विचारली आहेत.

नितेश म्हणाले सन २०१४ पासून त्यांचीच सत्ता आहे. गेल्या सात वर्षात तुम्ही आमची चौकशी करायला हवी होती. का नाही केली असा प्रश्न करीत संजय राऊतांनी प्रश्नांची उत्तर द्यावेत. नंदकिशोर चतुर्वेदी हे गृहस्थ कोण आहेत?, काही महिन्यांपासून ते का गायब आहेत?, कोणाचे फायनान्स सांभाळत होते? असे प्रश्न नितेश यांनी उपस्थित केले आहेत.

संजय राऊत यांनी आपल्या सरकारकडून त्याची चाैकशी करावी अशी अपेक्षा नितेश राणेंनी व्यक्त करुन अन्यथा आगामी काळात पत्रकार परिषद घेऊन आम्हीच सांगू असा इशारा दिला आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे सत्ताधारी पक्षाचे कामच आहे अशी टिप्पणी करीत आमचे नेते नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा कोणत्याही परिस्थितीत निघणारच असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला आहे.

दरम्यान आज सकाळी नितेश राणेंनी खासदार राऊत यांच्यावर ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची! अशी टीका केली आहे. याबाबत नितेश राणेंशी साम टीव्हीने संवाद साधला असता ते म्हणाले ज्यांना जी भाषा समजते त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते. जी भाषा माझ्या वडीलांबद्दल आणि कुटुंबियांवर वापरली ती याेग्य आहे का, सुस्कृंत भाषेत आमच्याशी बाेलले तर आम्ही तसं बाेलू. मात्र आमच्या आई, वडीलांबाबत कुटुंबियांबाबत काही बाेलले तर मग आम्ही जशास तसे उत्तर देणार. ते माझे कर्तव्य आहे असेही नितेश राणेंनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT