nitesh rane uday samant 
महाराष्ट्र

उदय सामंत म्हणजे कोकणातले शक्ती कपूर, सचिन वाझेंचे भाऊ : राणे

अनंत पाताडे

सिंधूदूर्ग : शिवसेनेला भारतीय जनता पक्षासमवेत असताना केंद्रात सत्तेत असताना जे जमले नाही ते नारायण राणे केंद्रीयमंत्री झाल्यानंतर झाले आहे. चिपी विमानतळाला केंद्राची लगेच परवानगी मिळाली. शासकीय मेडिकल कॉलेज किंवा विमातळालाही केंद्र शासनाची परवानगी लागते. त्यामुळे पत्रकार परिषदेत टोमणे मारण्यापेक्षा स्वतः शक्ती कपूर असलेल्या आणि कोकणातील सचिन वाझेचा भाऊ उदय सामंत यांनी केंद्राच्या मदतीने दोन्ही प्रकल्प मार्गी कसे लागतील हे पाहावे असा सल्ला भाजपा आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिला. nitesh-rane-criticizes-uday-samant-shakti-kapoor-kokan-news-sml80

पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन डीजीसीएने चिपी विमानतळास परवानगी दिल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेत सिंधुदुर्गातील शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. त्यावेळी सामंत यांनी राणेंना चिमटे काढले होते. त्यावर नितेश राणेंना प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्राच्या मान्यता मिळवणे डोक्यात टोप घालण्याएव्हढे सोपे नाही. राणे केंद्रीयमंत्री झाल्यावर लगेच चिपी विमानतळाला केंद्राची मान्यता मिळाली. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत म्हणजे कोकणचे शक्ती कपूर यांनी प्रकल्प पुर्णत्वाकडे लक्ष द्यावे असा सल्ला नितेश राणेंनी दिला आहे. राणेंच्या टीकेमुळे पुन्हा एकदा नितेश राणे आणि उदय सामंत nitesh rane uday samant यांच्यातील पत्रकबाजी वाढणार असे चिन्हं आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा- वर्षा गायकवाड

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT