Nitesh Rane, Maratha Reservation, Maratha Morcha, Jalna saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarakshan : नेमकं मराठा समाजाला बदनाम काेणाला करायचे आहे? नितेश राणे

Jalna Maratha Reservation : जालना येथे आज ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार उदयनराजे भाेसले यांच्यासह मान्यवर मराठा आंदाेलकांची भेट घेणार आहेत.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Nitesh Rane News : जालना येथील मराठा समाजावर झालेल्या (antarwali sarathi)  लाठीचार्जचे समर्थन कोणी करणार नाही. हा लाठीचार्ज कोणी मस्ती करून केले असेल तर त्या अधिकाऱ्यांना आमचे सरकार सोडणार नाही. त्यांच्यावर कारवाई होणार असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. (Maharashtra News)

राणे म्हणाले शांत पध्दतीने आंदोलन सुरू असताना दगड नेमके कोणी मारले ? या पूर्वीच्या 58 मोर्चात कोणालाही त्रास झाला नाही. शांत मोर्चा काढणारा मराठा समाज पोलिसांवर दगडफेक करेल असे मला वाटत नाही असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.

मराठा समाजाला नेमकं कोण बदनाम काेणाला करायचे आहे असा सवाल राणेंनी केला. ते म्हणाले मराठा समाजाला राणे साहेबांच्या समितीने आरक्षण मिळवून दिले आणि फडणवीस साहेबांनी ते ताकतीने सांभाळलं. विरोधकांनी केवळ मराठा समाजाची केस नाजूक कशी होईल यासाठी प्रयत्न केले असेही राणेंनी म्हटले.

ज्या सामना मुखपत्रात मराठा समाजाच्या माता भगिनींचा अपमान केला तेच आमच्यावर टीका करत आहेत असेही राणेंनी नमूद केले. वडेट्टीवार यांनी मराठा समाजावर बोलू नये असे राणेंनी म्हटले.

...तर आम्ही सहन करणार नाही : राणे

दरम्यान मराठा समाजाच्या मुलांवर केसेस झाल्या तर हे नेते येणार का. आमच्या मुलांवर चुकीच्या केसेस टाकू नका अशी मी विनंती करणार आहे. स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंय. त्यामुळे त्यांना बदनाम कोण करत असेल तर आम्ही सहन करणार नाही असेही नितेश राणेंनी म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Shave Bhaji Recipe : एक टोमॅटो अन् वाटीभर शेव, रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

Ashadhi Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

Language Row : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांची दिलगिरी; मराठी अस्मिता मोर्चाआधीच निर्णय

Amravati News: अमरावतीत बॉम्बची अफवा, 'या' परिसरात शोधमोहीम सुरू, पोलिसांचा मोठा फौजफाटा|VIDEO

Salt Scrub : मीठाचे पाणी त्वचेसाठी चांगले आहे का?

SCROLL FOR NEXT