Kolhapur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Crime News: निर्भया पथकाची कॅफेवर छापेमारी; ६ जोडपी आढळली नको त्या अवस्थेत

Nirbhaya Pathak On Action Mode: कॅफेमध्ये तरुण मुलं-मुली अश्लील चाळे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Kolhapur News:

कोल्हापूरमध्ये निर्भया पथक अॅक्शन मोडवर आलं आहे. निर्भया पथकाकडून करण्यात आलेल्या छापेमारीत एकूण सहा जोडपी नको त्या अवस्थेत आढळलीत. सदर घटनेमुळे कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडालीये. पोलिसांनी या सर्व जोडप्यांना ताब्यात घेतलं आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळा चौकातील टोकियो कॅसल कॅफेवर आज निर्भया पथकाने छापेमारी केली. या कॅफेमध्ये तरुण मुलं-मुली अश्लील चाळे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार छापेमारीत धक्कादायक वास्तव समोर आले.

कॅफेमध्ये भलतीच व्यवस्था

निर्भया पथकाच्या छापेमारीत कॅफेमध्ये पाठच्या बाजूलाला काही अंधाऱ्या खोल्या असल्याचे समोर आले. यातील काही खोल्यांमध्ये बेड देखील होते. निर्भया पथकाच्या कारवाईनंतर कॅफे मालकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांनी सहा जोडप्यांना ताब्यात घेतलं असून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक सुरू करण्यात आलं आहे. महिलांवरील अन्याय अत्याचार अशा गोष्टींना यामुळे चाप बसवला जातोय. महिलांसंदर्भात मदतीसाठी असलेला हेल्पलाईन, संपर्क क्रमांक १०३ आहे. महिलांना असुरक्षित वाटत असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोली राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद

पार्कमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या; बॅटनं मारलं अन् गोळ्या झाडल्या, CCTVतून मारेकऱ्याची ओळख पटली

Cancer Alert: आताच सावध व्हा! नकळत या गोष्टींमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

Who is Petal Gahlot: जगासमोर पाकच्या पंतप्रधानांचे तोंड बंद केलं, खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गहलोत कोण आहेत?

Vastu Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडतात? जाणून घ्या शास्त्र

SCROLL FOR NEXT