Navab Malik/ sameer Wankhede SaamTV
महाराष्ट्र

Sameer Wankhede : "जावयाला अटक केल्याचा वचपा, नवाब मलिक वानखेडेंवरती काढतायत..."

नवाब मलिकांची अवस्था पिसाळल्यासारखी असून ते काय बोलतात त्याला अर्थ नसतो. त्यांची वक्तव्य महाराष्ट्राच्या हिताची नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : नवाब मलिकांची Navab Malik अवस्था पिसाळल्यासारखी असून ते काय बोलतात त्याला अर्थ नसतो. त्यांची वक्तव्य महाराष्ट्राच्या हिताची नाहीत. जावयाला वाचवण्यासाठी, जावयाच्या प्रेमापोटी त्यांची ही वक्तव्य सुरु असल्याची टीका भाजप नेते निलेश राणे Nilesh Rane यांनी एका माध्यम प्रतिनिधीशी बोलताना केली.

हे देखील पहा -

मागच्या काही दिवसापासून जे काय चाललं आहे ते का आणि त्यांना काय करायचं होतं मला अजून पर्यंत माझ्या लक्षात आलेले नाही. मात्र हे सर्व जे मलिक करत आहेत ते फक्त जावयाला वाचवण्यासाठी जावयाच्या प्रेमापोटी हे सगळं करत असून आणि आता ते काय बोलतायत, काय करतायत, कोणाचे फोटो दाखवतायात त्यांना देखील माहीत नाही. त्यांची अवस्था पिसाळलेल्या सारखी झाली आहे. आणि म्हणून रोज एक नवीन आरोप ते करतात त्या आरोपांमध्ये काही दम नसल्याचही राणे म्हणाले.

तसेच एका अधिकाऱ्याची मलिकांना हकालपट्टी करायची आहे. मात्र ती होत नाहीये त्यामुळे रोज आरोपांची मालिका सुरु आहे. आपल्या जावयाला अटक केल्याचा वचपा अधिकाऱ्यावर काढायचा आहे. तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का? असा प्रश्न देखील निलेश राणेंनी मलिकांना विचारला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

SCROLL FOR NEXT