nilesh rane & vinayak raut & ajit pawar 
महाराष्ट्र

नितेशच्या गाडलाच प्रतिक्रियेनंतर निलेश राणेंचा पवार- राऊतांवर प्रहार

सिंधूदूर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीत राणे गटाची सरशी

अनंत पाताडे, अमोल कलये

सिंधूदूर्ग : सिंधुदूर्ग जिल्हा बँक निवडणूकीत (Sindhudurg District Central Co-operative Bank Election) भाजप म्हणजेच नारायण राणे गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. आजच्या मतमाेजणीनंतर भाजपने काेकणात जल्लाेष करण्यास प्रारंभ केला आहे. ही सिंधुदुर्गाची माती आहे इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो असे भाजप नेते निलेश राणेंनी ट्विट केले आहे. हे ट्टिट करताना त्यांनी उपमुख्यमंत्री आणि सेना खासदारांवर जहाल टीका केली आहे.

खूनाच्या गुन्ह्यात पाेलिसांना हवे असलेले आमदार नितेश राणे यांच्यासह भाजप नेते निलेश राणे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना नेते खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांचा ट्विट करुन समाचार घेतला आहे. Nilesh Rane Congraulates BJP Winning Candidates Sindhudurg District Central Co-operative Bank Election Criticises Ajit Pawar Vinayak Raut

निलेश राणे लिहितात धरण(--) पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला. कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं पण ही सिंधुदुर्गाची माती आहे. इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो. काळया विन्या राऊत तू बोलत रहा आमची निवडणूक सोप्पी होते. (Latest sindhudurga News)

एकंदरीतच नारायण राणे गटाच्या सरशीने (Sindhudurg District Bank Election Live updates) भाजपच्या गाेटात विशेषत: राणेंचे दाेन्ही चिरंजीव पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. राणे बंधूबराेबरच सिंधूदूर्गातील भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारच्या कटकारस्थानला येथील जनता भुलली नाही अशी भावना व्यक्त करीत आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT