NIA Raids Today In Maharashtra Saam Digital
महाराष्ट्र

NIA Raids Today In Maharashtra: महाराष्ट्र, कर्नाटकात ४० हून अधिक ठिकाणी NIA चे छापे, भिवंडी-पडघ्यातून १५ जण ताब्यात

NIA Raids Today In Maharashtra: आयसीस (ISIS) या दहशतावादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आणि दशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये तब्बल ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात भिवंडी पडघ्यातून १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Sandeep Gawade

NIA Raids Today In Maharashtra

आयसीस (ISIS) या दहशतावादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आणि दशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये तब्बल ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात भिवंडी पडघ्यातून १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एनआयएने आज पहाटेपासून ही कारवाई सुरू केली असून भिवंडी शहरातील चार जणांची चौकशी सुरू आहे. पकडण्यात आलेल्या या संशयित दहशतवाद्यांकडून पॅलेस्टाईनचा झेंडा, धारधार शस्त्रे, तलवारी, हार्ड डिस्क आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

आयसीसशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयएकडून ठाणे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण मध्ये ३१ तर ठाणे शहरात ९ ठिकाणी छापे टाकण्यात आले. तर भाईंदरमध्ये एका ठिकाणी, पुणे २ आणि कर्नाटकमध्ये एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. यात १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून शेकडो संशयितांची चौकशी सुरू आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. अल- कायदा आणि दहशदवादी संघटनांशी संबंध आणि दहशतवादी कट आणि कट रचण्यासाठी तरुणांना भडकवण्याच्या प्रकारांसंबंधी गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

एनआयएने ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये साकीब नाचणचाही समावेश आहे. शाकीब ट्रेन ब्लास्ट प्रकरणात आरोपी होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी दरशतवाजदी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून साकीब नाचणचा मुलगा शामील नाचण अटक करण्यात आली होती. एनआयएकडून यांच्यासह १५ जणांना ताब्यात घेतलं असून शेकडो संशयितांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

SCROLL FOR NEXT