Unseasonal Rain Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Unseasonal Rain Update : राज्यात पुढचे दोन दिवस अवकाळी पाऊस, या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

Weather News: हवामान खात्याने (Meteorological Department) पुन्हा पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

Priya More

Unseasonal Rain: गेल्या महिन्याभरापासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने ( Unseasonal Rain) राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. राज्यावर असलेल्या या अवकाळीचे सावट अद्याप संपले नाही. हवामान खात्याने (Meteorological Department) पुन्हा पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह हा अवकाळी पाऊस पडणार आहे. तर परभणी, लातूर, हिंगोली जिल्ह्यांना यलो अलर्ज जारी करण्यात आला आहे. या काळामध्ये शेतकरी आणि नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

नांदेड जिल्हयात गेल्या दहा ते बारा दिवसापासुन आवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. जिल्ह्यात तुफान पाऊस आणि गारपीट झाली. पाऊस, गारा आणि वादळीवाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेत पिकांचे मोठे नुकसान झाले. केळी, पपई, आंबा, ज्वारी आणि हळद यासह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. तर यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर पीकांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. राज्यातील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. राज्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा देखील अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. तर धुळे, नंदुरबार, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT