पैठणमध्ये ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून स्वीकारला हिंदू धर्म!  SaamTv
महाराष्ट्र

औरंगाबादमधील धर्मांतराची बातमी खोटी; पाटोळे कुटुंब गेले होते देवदर्शनाला!

पैठण मध्ये धर्मांतर झाल्याची माहिती खोटी असल्याचे खुद्द देवदर्शनासाठी गेलेल्या जालन्यातील पाटोळे कुटूंबायांनी साम टीव्हीशी संपर्क करून सांगितले आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : पैठण मध्ये धर्मांतर झाल्याची माहिती खोटी असल्याचे खुद्द दर्शनासाठी गेलेल्या जालन्यातील पाटोळे कुटूंबायांनी साम टीव्हीशी संपर्क करून सांगितले आहे. ज्ञानदेव बाबुराव पाटोळे त्यांची आई आणि त्यांच्या तीन बहिणींसह दोन दिवसांपूर्वी पैठण (Paithan) येथील मंदिरात देव दर्शनासाठी गेले होते. मात्र, धर्मांतराबाबत प्रसारमाध्यमांत आलेले वृत्त खोटे असल्याची माहिती ज्ञानदेव बाबुराव पाटोळे यांनी दिली आहे.

हे देखील पहा :

पाटोळे कुटुंब पैठण येथे देव दर्शनासाठी गेले असता त्या ठिकाणी नाथ मंदिरात, मंदिर प्रशासनाच्या वतीने आमचा भाविक म्हणून सत्कार करण्यात आला. आम्ही देवदर्शनासाठी गेलो होतो. मात्र, आमचे फोटो माध्यमावर आम्ही धर्मांतर (conversion) केले म्हणून प्रसिद्ध करण्यात आले. आम्ही कुठल्या ही प्रकारचा धर्म बदललाच नसल्याने धर्मांतराचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे या कुटूंबानी म्हटले आहे.

आम्ही आज जालना (Jalna) शहरात आल्या नंतर आम्हाला अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्या असल्याची माहिती मिळली असल्याची माहिती ज्ञानदेव बाबुराव पाटोळे यांनी दिली. आम्ही पूर्वी पासूनच हिंदू (Hindu) धर्मातील मातंग समाजाचे असून कुठल्याही प्रकारचे धर्मांतरण आम्ही या पूर्वी केले नव्हते. त्यामुळं धर्मांतर करण्याचा प्रश्नच निर्माण होण्याचा प्रश्नच येत नसल्याचं पाटोळे कुटूंबियाकडून सांगण्यात आलं आहे. मुळात फोटोतील आम्ही सर्व नातेवाईक असून जालना शरातील नूतन वसाहत आणि रोंहवाडी या परिसरात राहतो, आज जालन्यात आल्या नंतर आम्हाला ही माहिती मिळाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kisan Credit Card : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! KCC मधून मिळणार तब्बल ₹5 लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update: दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेला जामीन

CM फडणवीस आता कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलणार; थेट GR चा काढला

Shocking : १० दिवसांपासून पिकअप एकाच जागेवर, दुर्गंधी आल्यानंतर पाहिलं अन् पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली

Fatty liver: लिव्हरवर चरबी जमा झालीये? आहारात या ७ फळांचा समावेश करा, यकृताला मिळू शकतो फायदा

SCROLL FOR NEXT