Newlywed Couple Jumps into Vashishti River in Chiplun  saam tv
महाराष्ट्र

Shocking News : नवविवाहित जोडप्यानं एकत्रच वशिष्ठी नदीत उडी मारली, काही महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

Chiplun News : चिपळूणच्या वशिष्ठी नदीत नवविवाहित दाम्पत्यानं उडी मारली. ते मूळचे धुळ्यातील आहेत. ज्या तरुणानं नदीत उडी मारली, तो मागील आठ वर्षांपासून चिपळूणमध्ये वास्तव्यास होता.

Nandkumar Joshi

  • नवविवाहित जोडप्यानं वशिष्ठी नदीत मारली उडी

  • चिपळूणमधील धक्कादायक घटना

  • पुलावर आल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची

अमोल कलये, साम टीव्ही | रत्नागिरी

चिपळूणमध्ये आज सकाळी धक्कादायक घटना घडली. एका नवविवाहित दाम्पत्यानं वशिष्ठी नदीत उडी मारून एकाच वेळी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं शहरात खळबळ उडाली. काही महिन्यांपूर्वीच या दाम्पत्याचं लग्न झालं होतं.

नीलेश रामदास अहिरे आणि अश्विनी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी वशिष्ठी नदीत एकत्रितच उडी मारली. गांधेश्वर मंदिराजवळ ही घटना घडली. तरुणीचा पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती.

चिपळूणमध्ये नीलेशचा मोबाइल शॉपी आहे. मागील आठ वर्षे तो चिपळूणमध्ये वास्तव्यास आहे. तो मूळचा धुळे येथील आहे. पागेवर भाडेपट्टीवर तो राहतो. काही महिन्यांपूर्वी अश्विनीसोबत त्याचं लग्न झालं होतं.

आज, बुधवारी सकाळी ते दोघेही मोटरसायकल घेऊन चिपळूणमधील गांधारेश्वर पुलावर आले. त्याठिकाणी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर पुन्हा ते दोघे मोटरसायकल घेऊन पुढे निघून गेले. काही वेळाने ते पुन्हा पुलावर आले. अश्विनी आणि नीलेशने एकाच वेळी पुलावरून नदीपात्रात उडी मारल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याचं नेमकं कारण स्पष्ट झालेले नाही. एनडीआरएफ पथकाकडून या दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

डॉक्टरच्या मुलानं मृत्यूला कवटाळलं

चिपळूण शहरातील वाणी आळी येथील एकता अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ओवेस जुल्फीकार मुल्ला या २२ वर्षीय तरुणानं आत्महत्या केली. ओवेसचे वडील हे डॉक्टर आहेत. ओवेस हा घरातील शौचालयात गेला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही. त्यामुळं कुटुंबीयांना शंका आली. त्यांनी दरवाजा तोडला. ओवेसनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. ओवेस हा फार्मासीचं शिक्षण घेत होता. त्यानं कोणत्या कारणानं मृत्यूला कवटाळलं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT