धक्कादायक! माजलगाव बसस्थानक शेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळले नवजात अर्भक Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! माजलगाव बसस्थानक शेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळले नवजात अर्भक

बीडच्या माजलगाव बसस्थानकाच्या आवारातील शौचालयालगत, एक मयत अर्भक आढळून आल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली

विनोद जिरे

बीड : बीडच्या माजलगाव बसस्थानकाच्या आवारातील शौचालयालगत, एक मयत अर्भक आढळून आल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. तर या धक्कादायक घटनेची माहिती समजताच, घटनास्थळी माजलगाव शहर पोलिसांनी धाव घेतली आहे.

हे देखील पहा-

माजलगाव शहरातील बस्थानाकाच्या परिसरामध्ये, कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काही वेळापूर्वी हे मयत अर्भक आढळून आले आहे. यावेळी अर्भकावर माश्यांचा थर बघायला मिळाला आहे. तर हे अर्भक 5 ते 6 महिन्याचे असून स्त्री जातीचे असल्याचा प्राथमिक अंदाज माजलगाव पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान अर्भक ताब्यात घेत माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर हे अर्भक कुणाचे आहे? कुणी फेकले? याबाबत तपास माजलगाव शहर पोलीस करत असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या तपासला वेग येईल असे देखील पोलीस म्हणाले आहेत. तर या घटनेने माजलगावसह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील शिरलस शेतशिवारात बिबट्याचा वावर

Velachiche Pani: १ ग्लास वेलचीचे पाणी ठरेल 'अमृत', १५ दिवसांत शरीरात दिसेल बदल

Monsoon health tips: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? आहारात व्हिटॅमिन C असलेले पदार्थ ठेवा!

Fried Modak Recipe: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायासाठी बनवा खुसखुशीत स्वादिष्ट तळणीचे मोदक; वाचा सोपी रेसिपी

Mysterious Fort : सोनं-चांदीने भरलेल्या विहिरी! 'या' किल्ल्यातील गुप्त खजिन्याचं रहस्य आजही कायम

SCROLL FOR NEXT