Government may tighten ration card eligibility norms from April 1; households with cars or AC could lose benefits. Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! घरात AC, कार रेशन कार्ड रद्द होणार? 70 लाख रेशनधारकांना फटका बसणार

Government Tightens Ration Card Eligibility: तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही बातमी आर्वजून पाहा... रेशन कार्ड पात्रतेचे निकष अधिक कडक करण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांबाबत सरकारने काय निर्णय घेतलाय ? आणि लाखो कुटुंबाना त्याचा कसा फटका बसणार आहे? पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

सर्वसामान्य गरजू कुटुंबियांना या महागाईच्या काळात रेशनकार्डचा मोठा आधार असतो. स्वस्त धान्य दुकानात गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल हे जीवनावश्यक पदार्थ अल्प दरात मिळतात. मात्र आता लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष अधिक कडक होणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गरजू कुटुंबांपर्यंतच मोफत धान्य पोहोचावे यासाठी ही सुधारित नियमावली लागू करण्यात येत आहे. जर तुमच्याकडे कार आणि एसी असेल तर तुमचं रेशन कार्ड थेट रद्द होणार आहे. तुम्हाला रेशन दुकानाचा कोणताही लाभ घेता येणार नाही. वन नेशन, वन रेशन योजना प्रभावी लागू करण्यासाठी नवीन नियम काय आहेत ? आणि कधीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. पाहूया...

कार, AC असेल तर रेशन कार्ड रद्द ?

1 एप्रिलपासून रेशन कार्डबाबत नवीन नियम

रेशन कार्डधारकांची काटेकोर छाननी होणार

गरजूंपर्यंतच योजना पोहचण्यासाठी सुधारित नियमावली

आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांची नावं यादीतून वगळणार

देशात सुमारे 70 लाख रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता

सरकारच्या या निर्णयामुळे नियमांमध्ये बसत नसलेल्या लाखो लाभार्थ्यांचे रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेशनकार्ड वापरणाऱ्या नागरिकांनी नवीन नियमांची माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे.पिवळे, केशरी, पांढरे असे रेशनकार्डचे तीन प्रकार आहेत. त्यानुसार कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि सरकारी योजनांमधील पात्रता ठरवली जाते. पिवळे कार्ड हे वार्षिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या दारिद्र रेषेखालील कुटुंबासाठी आहे. केशरी कार्ड हे वार्षिक उत्पन्न 15 हजार ते 1 लाख रुपये तर वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असलेल्या गटासाठी पांढरे रेशनकार्ड आहे.

या योजनेमुळे लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही राज्यात रेशन मिळणं शक्य असले तरी पात्रतेचे निकष काटेकोरपणे तपासले जाणार आहेत. लाभार्थ्यांच्या छाननीत चुकीची माहिती देऊन रेशनकार्ड घेतलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कुटुंबांची नावे यादीतून वगळली जाणार आहेत. त्यामुळे लाखो लाभार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT