Beed Accident News
महाराष्ट्र

Beed Accident : भरधाव वेगात कारची कंटेनरला धडक; भीषण अपघातात भाजप नेत्याचा पुतण्या ठार

धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराईनजीक झाला अपघात...

विनोद जिरे

Beed Accident News : भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, कारने धावत्या कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात भाजप नेते मोहन जगताप यांचा 22 वर्षीय पुतण्या जागीच ठार झाला आहे. हा भीषण अपघात बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई नजीक झाला आहे. विश्वजित जगताप असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

माजलगाव येथील भाजपचे (BJP नेते व छत्रपती सहकारी कारखान्याचे चेअरमन मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जगताप हे अन्य एका मित्रा समवेत औरंगाबाद (Aurangabad) कडुन माजलगावकडे क्रेयटा कारने जात होते. याचदरम्यान गेवराई नजीक विश्वजीत जगताप यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्यांची क्रेयटा कार समोर चालत असलेल्या कंटेनरवर धडकल्याने भिषण अपघात झाला.

याच अपघातात विश्वजीत जगताप यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक मित्र जखमी झाला असल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातात विश्वजित याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT