सांगलीकरांना गुड न्यूज! विदेशातुन आलेले सर्व प्रवाशी निगेटिव्ह Saam TV
महाराष्ट्र

सांगलीकरांना गुड न्यूज! विदेशातुन आलेले सर्व प्रवाशी निगेटिव्ह

आत्तापर्यंत 156 प्रवाशांची महापालिकेकडून ट्रेसिंग, तर 76 लोकांचा संपर्क होत नाही.

विजय पाटील

सांगली : विदेशातुन सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात आलेल्या सर्व प्रवाशांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आत्तापर्यंत महापालिकेला प्राप्त 156 प्रवाशांची महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून ट्रेसिंग करण्यात आली आहे, तर 76 लोकांचा संपर्क होत नसल्याने प्रशासनाची चिता वाढली आहे. महापालिका प्रशासनाला आतापर्यंत 156 विदेशी प्रवाशांची यादी पाठवण्यात आली होती. यादी प्राप्त होताच मनपाकडून सर्वाना संपर्क साधण्यात आला होता.

या 156 मध्ये मनपाक्षेत्रात एकूण 37 प्रवाशी आढळले आहेत, तर 156 पैकी 43 प्रवासी परत गेले आहेत. आणि 76 लोकांचा संपर्क होत नाही. 37 लोकांची RT-PCR करण्यात आली आहे. यापैकी 29 व्यक्ती निगेटिव्ह आले असून नवीन यादीमधील 11 प्रवाशांचे रिपोर्ट अद्याप पेंडिंग आहेत. पहिल्यांदा आलेल्या जुन्या 99 प्रवासी यादीमधील सर्व प्रवासी आणि नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल ऑफिसर डॉ. वैभव पाटील यांनी दिली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

SCROLL FOR NEXT