CBI investigation intensifies as student admits receiving NEET question paper 10 days before exam. saam tv
महाराष्ट्र

10 दिवस आधी नीटचा पेपर मिळाला? क्लास संचालकाच्या मुलाची कबुली

Neet Paper Leak Student Confession Cbi Investigation: नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या शिक्षिकांच्या जबाबानंतर आता एका विद्यार्थ्याची कबुली सीबीआय तपासात महत्वाची ठरणार आहे. या मुलाने सीबीआयच्या पथकाला काय माहिती दिली ? तपास यंत्रणेला आणखी कोणते धागेदोरे मिळाले ?

Girish Nikam

NEET पेपरफुटी प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर आता सीबीआयच्या तपासात धक्कादायक बाबी समोर येतायेत. अटक झालेल्या प्राध्यापिकांच्या जबाबात पेपरफुटीची मोडस ऑपरेंडी समोर येत असतानाच एका विद्यार्थ्यानेच 10 दिवस आधी नीटचा पेपर मिळाल्याची कबुली सीबीआय पथकासमोर दिली आहे. लातूरमधील एका क्लास संचालकाच्या 17 वर्षीय मुलानं परीक्षेच्या तब्बल 10 दिवस आधीच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या तिन्ही विषयांचे पेपर मिळाल्याची कबुली दिलीय...त्यामुळे या विद्यार्थ्याला साक्षीदार केलं जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे CBIनं पुण्यातून तेजस शाह नावाच्या आणखी एका शिक्षकाला बेड्या ठोकल्यात. ज्यानं मनीषा हवालदारकडून नीटचा पेपर विकत घेतला होता. तेजस शाहचा मोबाईल नंबर मनीषा हवालदारनं आपल्या मोबाईलमध्ये 'GOD' नावानं सेव्ह केला होता.

तेजस शाह कोण आहे पाहुयात

कोण आहे तेजस शाह?

- तेजस शाह फिजिक्सचा प्रोफेसर

- पुण्यातील नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये शिकवत होता

- मागील 14 वर्षांपासून पुण्यातील APMA क्लासेसमध्ये काम

- मनीषा हवलदारकडून शाहानं घेतले फिजिक्सचे पेपर

शहाच्या अटकेमुळे आत्तापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या 13 झाली आहे. सीबीआयच्या तपासात आणखी गोष्टी समोर आलेल्या आहेत. लातूरमधील अटकेत असलेला बालरोगतज्ञ डॉ. मनोज शिरूरेनं आरोपी निवृत्त प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णीकडून रसायनशास्त्र विषयाचा पेपर मिळवला. हा पेपर शिरुरेने लातूरमधील RCC क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकरलाही दिला. नीट पेपर होण्यापूर्वीच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोटेगावकरच्या मुलासह इतर 2 विद्यार्थ्यांना पेपर दिला होता. दिलेले प्रश्न आणि मूळ परीक्षेतील प्रश्न जुळलेयत. सीबीआय आता या विद्यार्थ्यांचीही चौकशी करणार आहे. दुसरीकडे फिजिक्सचा पेपर मिळवण्यासाठी एका विद्यार्थ्यानं आरोपी मुख्याध्यापिका मनीषा हवालदारला 20 हजार दिले. हवालदारनं दिलेले प्रश्न या विद्यार्थ्यानं वहीत लिहून घेतले. घरी गेल्यावर प्रश्नांचे फोटो काढून त्यांनाच पाठवले. अशी माहिती तपासात समोर आली आहे.

नीट प्रकरणात अटक झालेले आरोपी पुणे, लातूर, नाशिक आणि अहिल्यानगरमधील आहेत. शिक्षिकी पेशाला कलंक लावलेल्या आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी, असाच सूर सर्वत्र उमटतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा; सामन्याच्या मानधनात तब्बल 50 टक्के कपात, अचानक नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हिंगोलीत ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर' यशस्वी की अयशस्वी? उद्या ठाकरेसेना घेणार मोठा निर्णय

PM Modi- Donald Trump: PM मोदींसमोरच डोनाल्ड ट्रम्प यांचं ठोस आश्वासन; म्हणाले, भारतावर हल्ला झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत...

Operation Manjar: ऑपरेशन टायगरनंतर महाराष्ट्रात सुरू होणार 'ऑपरेशन मांजर', एकनाथ शिंदेवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT