NEET exam controversy erupts after a massive paper leak linked to Nashik affects over 2.2 million students across India. saam tv
महाराष्ट्र

NEET चा पेपर कसा फोडला? 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला

22 Lakh Students Affected as NEET Paper Leak Scandal Surfaces : बुलेटीनच्या सुरूवातीला सर्वात मोठी बातमी....मेडिकल प्रवेशासाठी ३ मे रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आलीय. नेमकं काय झालं? कुणी फोडला नीटचा पेपर? नाशिकधून कोणकोणत्या राज्यात गेला पेपर?

Suprim Maskar

वैद्यकीय प्रवेशासाठीची अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नीट' परीक्षा अखेर पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली...मात्र या पेपरफुटीची पाळंमुळं आता महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत पोहचलीयत...केरळ, राजस्थाननंतर आता नाशिकमधून हा पेपर व्हॉट्स अॅप आणि टेलिग्रामद्वारे लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय...

NEETच्या फुटलेल्या पहिल्या पेपरची पहिली कॉपी नाशिकमध्ये मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...याच फुटलेल्या पेपरचे 10 सेट्स वेगवेगळ्या राज्यात लीक झाले... नाशिकमधून सर्वात पहिल्यांदा हा पेपर हरियाणात लीक करण्यात आला. तिथून राजस्थानच्य़ा जयपूर, जमावारामगढ येथे पेपर पाठवण्यात आला... तिथून सीकर त्यानंतर जम्मू काश्मीर, बिहार, केरळ आणि मग उत्तराखंडमध्ये पेपर लीक करण्यात आला... 3 मेला होणाऱ्या नीट पेपरच्या 42 तास आधी म्हणजे 1 मे लाच विद्यार्थ्यांच्या WhatsApp आणि टेलिग्रामवर हा पेपर लीक झाला...तरी नाशिकमधून लीक झालेल्या पेपरमधील 600 मार्कांचे प्रश्न एकदम तंतोतंत असल्याचं समोर आलंय़ं...त्यात हा पेपर विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 लाखांला विकला गेल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केलाय.

राजस्थानच्या एसओजींनी (SOG) 15 जणांना अटक केल्यानंतर आता तपासाची सुई नाशिककडे वळलीय. नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्यानेच हा पेपर परराज्यात वितरित केल्याचा संशय आहे. मात्र नीट परीक्षेच्या पेपरफुटीने देशातील 22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलयं...यातले महाराष्ट्रातील सुमारे सव्वा दोन लाख विद्यार्थी वर्षभर मेहनत करून परीक्षेला सामोरे गेले होते.

देशात गेल्या 10 वर्षात 89 वेगवेगळ्या परिक्षांचे पेपर लीक झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय... त्यामुळे आता नीट पेपरफुटीचा तपास सीबीआय करत असलं तरी 89 परिक्षांचे पेपर लीक झाल्यानंतर आरोपींवर कोणती कारवाई करण्यात आली हा सवाल आहेच...त्यामुळे नाशिकमधील संशयित आरोपी कोण आहे? त्याच्या मागे बडे शिक्षण सम्राट आहेत का? या रॅकेटची व्याप्ती नेमकी कोणकोणत्या राज्यातपर्यंत आहे? या प्रश्नांची उत्तरं आता शोधणं गरजेचं आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या अशा घटना घडू नये यासाठी सरकारनं गंभीर उपाययोजना करण्याचीही गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSC-HSC Supplementary Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Wednesday Horoscope: कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता, ५ राशींना मिळणार उत्तम फळ; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Virar Crime: भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; विरार हादरलं!

Maharashtra News Live Update: CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल

Crime News: सून छोटे कपडे घालून रिल्स बनवायची; सासू सासरे कंटाळले, नैराश्यातून धक्कादायक पाऊल उचलले

SCROLL FOR NEXT